पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'उरी'नंतर येणार १९७१च्या युद्धात भारतीय नौदलाची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट

भारत पाकिस्तान

'उरी  द सर्जिकल स्ट्राइक्स'च्या यशानंतर १९७१च्या युद्धात पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भारतीय नौदलाची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट लवकरच  येणार आहे. १९७१ साली झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानमधील महत्त्वाच्या अशा कराची बंदरावर हल्ला करून पाक सैन्याला कमकूवत केलं  होतं. 

याच घटनेवर आधारित लवकरच चित्रपट येणार आहे. तनुज गर्ग, अतुल कस्बेकर आणि स्वाती अय्यर चावला यांच्यासोबत मिळून भूषण कुमार भारतीय नौदलावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटांचं नाव  नेव्ही डे असेन. ४ आणि ५ डिसेंबरच्या रात्री भारतीय नौदलानं  'ऑपरेशन ट्रायडंट' अंतर्गत  पाकिस्तानच्या कराची  बंदरावर हल्ला  केला. याता शत्रुपक्षाचं मोठं नुकसान झालं. भारतीय नौदलाची  शौर्यगाथा या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. 

ऑगस्ट-सप्टेंबर या काळात चित्रपटाची संहिता तयार करण्यात येणार असून त्यानंतर कलाकारांची निवड करण्यात  येणार आहे. कलाकारांची निवड झाल्यानंतर चित्रपटासाठी सेट उभारण्याचं काम सुरू करण्यात येईल आणि त्यानंतर शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं समजत आहे. रजनिश घई या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. २०२० मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला  सुरूवात होईन तर २०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.