अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधलं चर्चेच असणारं जोडपं होय. वर्षभरापूर्वी आलिया रणबीरनं प्रेमाची कबूली दिली. तेव्हापासून आलिया- रणबीरच्या मागे अनेकांनी लग्न कधी करणार या प्रश्नाचा तगादा लावला आहे. लग्नाच्या प्रश्नांनी या दोघांचा पिच्छा पुरवला आहे.
लेडी गागा आणि बप्पी लहरी वर्षाअखेरिस घेऊन येणार हिंग्लिश गाणं
ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा अनेकदा ऐकायला मिळतात. मात्र आता या दोघांच्या नावाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही लग्न पत्रिका खोटी असल्याचं समोर आलं आहे.
Heartiest Congratulations 🎊 🎆 🎷 🎺 📯 Dear @aliaa08 & @iamRanbirKapoor on your #engagement #RingCeremony & #wedding!@ranbirrk @RanbirKUniverse @RanbirDaily @RanbirOnly @RanbirKapoor360 @ranvir01 pic.twitter.com/JwSj0OmgYb
— UP_Midlands (@UpMidlands) October 20, 2019
या लग्नपत्रिकेतील आलियाच्या नावाची स्पेलिंग चुकीची आहे त्याचप्रमाणे तिच्या वडिलांचे नावही चुकीचे लिहिले आहे. त्यामुळे ही पत्रिका खोटी असल्याचं समोर आलं आहे.
गेल्या पाच वर्षांत केवळ ८ बॉलिवूड चित्रपटांची कमाई ३०० कोटींच्या घरात
सोशल मीडियावर अनेकदा शाहनिशा न करता काही खोट्या बातम्या पसरवल्या जातात तशाच स्वरूपाची ही लग्न पत्रिका असल्याचं समोर आलं आहे.