पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अब्रूनुकसानीच्या खटल्याप्रकरणी कंगना- रंगोलीला न्यायालयानं बजावले समन्स

कंगना आदित्य

अभिनेता आदित्य पांचोली आणि त्याच्या पत्नीनं दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्याप्रकरणी न्यायालयानं अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली चंडेल हिला समन्स बजावले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २६ जुलैला होणार आहे. 

कंगनानं टेलिव्हिजन मुलाखतीत तर तिची बहिण रंगोली हिनं ट्विटरवरून आदित्य पांचोली आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात प्रतिक्रिया दिल्या होत्या. या प्रतिक्रिया  बदनामीकारक असल्याचं  आदित्य पांचोली आणि त्याची पत्नी झरिना वाहाब हिचं म्हणणं आहे. 

नातं संपलं म्हणून बलात्काराचे आरोप करून चालत नाही, आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनाला टोला

आदित्य पांचोली यानं आपल्याला घरात कोंडून ठेवलं असा आरोप कंगनानं केला. याप्रकरणी तिनं आदित्यविरोधात पोलिस स्थानकात तक्रारही केली असल्याचं तिनं जुन्या मुलाखतीत म्हटलं होतं, मात्र याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाही तिनं आदित्य पांचोळी यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला असं, असं आदित्यचे वकील म्हणाले.  

मुस्लिम सून चालते पण जावई नको, सुनैनाच्या प्रियकराचा सवाल

कंगनाची बहिण रंगोली हिनं देखील सोशल मीडियाद्वारे खोटे आरोप केले असल्याचं आदित्यच्या वकिलांचं म्हणणं आहे. अब्रूनुकसानीच्या खटल्या प्रकरणी कंगना आणि रंगोली या दोघांना दंडाधिकारी न्यायालयाने दोन समन्स बजावले आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A court has issued summons to Bollywood actor Kangana Ranaut and her sister Rangoli Chandel defamation cases