तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रवीण मोर्चाले यांनी आयुष्मान खुरानाच्या 'बाला' चित्रपटाचे लेखक आणि निर्मात्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. लेखक निरेन भट्ट आणि 'बाला'ची निर्माती संस्था मॅडॉक फिल्म्सनं आपली पटकथा उचलली असल्याचा दावा प्रवीण यांनी केला आहे.
'गर्ल्स' आणि 'फत्तेशिकस्त' मधली टक्कर टळली
स्वामित्त्व हक्काचं उल्लंघन केल्याप्रकरणी लेखक आणि निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'मी लिहिलेल्या कथेशी बालाची कथा ही साधर्म्य दाखवणारी आहे. २००७ साली मी या कथेची चित्रपट लेखक संघटनेकडे नोंदणी केली होती. मी चित्रपटाच्या कथेवर दोन वर्षे मेहनत घेतली. मी खात्रीलायक सुत्रांकडून माहिती घेतली आहे. मी लिहिलेल्या कथेशी बालाची कथा मिळती जुळती आहे' असं प्रवीण 'मुंबई मिरर'ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले.
लता मंगेशकर यांच्या प्रतिक्रियेवर रानू म्हणतात..
मी या चित्रपटाच्या संबधीत एकाही व्यक्तीला भेटलो नाही. पण २००५ पासून या चित्रपटाची कथा मी अनेक लोकांना ऐकवली आहे. या कथेचे स्वामित्त्व हक्क माझ्याकडे आहेत त्यामुळे कोणीही माझ्या परवानगीशिवाय या कथेचं अनुकरण करु शकत नाही. हा स्वामित्त्व हक्क कायद्याचा भंग आहे असंही ते म्हणाले.