पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२० नोव्हेंबरपासून सुरु होणार ५० वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये या महोत्सवाचे गोव्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे.  या चित्रपट महोत्सवात २०० पेक्षा अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या चित्रपट महोत्सवाच्या तारखेची घोषणा केली. 

शेवटचा दिवस ढकलायला आफ्रिकेला जमलं नाही, भारताचा दिमाखदार विजय

जावडेकरांनी सांगितले की, यंदाच्या वर्षी रशिया या चित्रपट महोत्सवातील भागीदार देश असेल. तसंच, या चित्रपट महोत्सवा दरम्यान विविध स्थानिक भारतीय भाषांचे २६ फीचर आणि १५ नॉन-फीचर चित्रपट दाखवले जाणार आहे. या व्यतिरिक्त जवळपास ५० वर्षापूर्वीचे वेगवेगळ्या भाषांमध्ये बनलेले १२ चित्रपट देखील या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. 

विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वॉड्रनचा हवाईदलाकडून सन्मान

या चित्रपट महोत्सवात वेगवेगळे चित्रपट कलाकार आणि सुमारे १० हजार चित्रपटप्रेमी सहभागी होणार आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसंच त्यांचे ७ ते ८ चित्रपट सुध्दा या महोत्सवा दरम्यान दाखवले जाणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.  

सैन्य दलाच्या त्रासाला कंटाळून चंदू चव्हाणने दिला राजीनामा