पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'इफ्फी'मध्ये पाहायला मिळणार 'गली बॉय', 'सुपर ३०'

गली बॉय

भारताचा ५० वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 'इफ्फी'  २० ते  २८ नोव्हेंबर रोजी गोव्यात पार पडणार आहे. या महोत्सवात ७६ देशांतील २६ फीचर आणि १५ नॉन-फीचर चित्रपट दाखवले जाणार आहे.  फीचर फिल्म विभागात दाखवल्या जाणाऱ्या २६ चित्रपटांमध्ये  आदित्य धर यांचा 'उरी द सर्जिकल स्ट्राईक', हृतिक रोशनचा 'सुपर ३०' आयुष्मान खुरानाचा 'बधाई हो' आणि ऑक्सर पुरस्कारासाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या ' गली बॉय'चा समावेश आहे. हे बॉलिवूड चित्रपट रुपेरी पडद्यावर खूपच लोकप्रिय ठरले होते. 

'बिग बॉस रिअ‍ॅलिटी शो'वर अश्लीलतेचा आरोप, शो बंद करण्याची मागणी

तर इंडियन पॅनोरमा  विभागाचा शुभारंभ  'हेल्लारो' या गुजराती चित्रपटानं होणार आहे. या चित्रपटाला ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट  पुरस्कार समारोहात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कारदेखील मिळाला होता. यंदाच्या वर्षी रशिया या चित्रपट महोत्सवात सहभागी होईल अशी माहिती  माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसंच त्यांचे ७ ते ८ चित्रपट सुध्दा या महोत्सवात दाखवले जाणार आहेत.

ऋषी कपूर यांनी केले खास फोटोशूट; चाहत्यांची मिळतेय पसंती