पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'इफ्फी'मध्ये इंडियन पॅनोरमासाठी पाच मराठी चित्रपटांची निवड

आनंदी गोपाळ

भारताचा ५० वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 'इफ्फी'  २० ते  २८ नोव्हेंबर रोजी गोव्यात पार पडणार आहे. या महोत्सवातील भारतीय पॅनोरमा विभागात  एकूण पाच मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

 देशातील एकूण २६  हिंदी चित्रपटासह विविध प्रादेशिक चित्रपटातून ही निवड झाली आहे. यामध्ये सुजय डहाके दिग्दर्शित 'तुझ्या आयला ', समीर विद्वांस दिग्दर्शित 'आनंदी गोपाळ ', शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'भोंगा ' , अनंत महादेवन दिग्दर्शित 'माई घाट : क्राईम नंबर १०३|२००५ , आदित्य राही आणि गायश्री पाटील दिग्दर्शित 'फोटो प्रेम ' या मराठी  चित्रपटांचा समावेश आहे. तर या पॅनोरमा विभागात बंगाली आणि मल्याळम भाषेतील प्रत्येकी तीन चित्रपट आहेत. पॅनोरमा विभागात गतवर्षी फक्त दोन मराठी चित्रपट होते. 

'इफ्फी'मध्ये पाहायला मिळणार 'गली बॉय', 'सुपर ३०'

 इंडियन पॅनोरमा  विभागाचा शुभारंभ  'हेल्लारो' या गुजराती चित्रपटानं होणार आहे. या चित्रपटाला ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट  पुरस्कार समारोहात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कारदेखील मिळाला होता. फीचर फिल्म विभागात काही हिंदी चित्रपट दाखवले जाणार आहेत. फीचर फिल्ममध्ये दाखवल्या जाणाऱ्या २६ चित्रपटांत आदित्य धर यांचा 'उरी द सर्जिकल स्ट्राईक', हृतिक रोशनचा 'सुपर ३०' आयुष्मान खुरानाचा 'बधाई हो' आणि ऑक्सर पुरस्कारासाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या ' गली बॉय'चा समावेश आहे. 

'बिग बॉस रिअ‍ॅलिटी शो'वर अश्लीलतेचा आरोप, शो बंद करण्याची मागणी

या महोत्सवाच्या विविध विभागात ७६ देशातील विविध भाषिक दोनशे चित्रपटांचा समावेश आहे.