पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जपान : चित्रपटगृह कायमचे बंद करण्यापूर्वी दाखवला आमिरचा हिट चित्रपट

२००९ साली आमिर खानचा थ्री इडियट्स प्रदर्शित झाला

आमिर खानचा 'थ्री इडिट्स' हा बॉलिवूडमधील 'ऑल टाइम हिट' चित्रपट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. केवळ भारतातच नाही तर चीनमध्येदेखील हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचा शेवटचा शो दाखवून जपानमधील चित्रपटगृहानं प्रेक्षकांचा कायमस्वरुपी निरोप घेतला. 

गंगेच्या तिरावर सारानं व्यतीत केली रम्य संध्याकाळ

जपानमधील ओकासा शहरातील फ्यूज लाइन सिनेमा हे चित्रपटगृह कायमस्वरुपी बंद झालं आहे . २९ फेब्रुवारीला या चित्रपटगृहात शेवटचा शो दाखवण्यात आला. यावेळी थ्री इडियट्स चित्रपटगृहात दाखवण्यात आला. चित्रपटाच्यावेळी संपूर्ण चित्रपटगृह हाऊसफुल्ल होतं असंही समजत आहे. 

उशीर होण्यासाठी दीपिका कारणीभूत, रणवीरच्या थापा

२००९ साली आमिर खानचा थ्री इडियट्स प्रदर्शित झाला. २०१३ मध्ये  तो जपानमध्ये प्रदर्शित करण्यात आला. याचवर्षी तो चीन, तैवान, हाँगकाँगमध्येही प्रदर्शित झाला. आमिर खान, आर माधवन, बमन इराणी, शरमन जोशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं तिथेही खूप कमाई केली. जपानमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल सात वर्षांनी तोच चित्रपट चित्रपटगृहात दाखवून निरोप घेण्याचा निर्णय मालकानं घेतला. हा चित्रपट पाहण्यासाठी तेवढीच प्रेक्षकांची गर्दी जमली होती.