पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कमल हासन यांच्या 'इंडियन २'च्या सेटवर अपघात, ३ मृत्युमुखी

कमल हासन यांच्या 'इंडियन २'च्या सेटवर अपघात

दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांच्या  'इंडियन २'  चित्रपटाच्या सेटवर झालेल्या भीषण क्रेन अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ९ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

जर्मनीमध्ये गोळीबार, ८ जणांचा मृत्यू

कमल हासन हे सुखरुप आहेत तर इतर ९ जण जखमी झाले आहेत अशी माहिती समजत आहे. हा अपघात नाजरपेटमध्ये झाला. क्रेन चालवणारा कर्मचारी ती सरळ उभी करण्याचा प्रयत्न करत होता मात्र ती कोसळली. यावेळी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. एका खासगी स्टुडिओमध्ये 'इंडियन २' चं चित्रीकरण सुरु होतं.

'राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट तयार करु शकता तर मशिदीसाठी का नाही?'

१४ एप्रिल २०२० ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात कमल हासन हे एका वृद्घ व्यक्तीची भूमिका साकारत आहेत.