पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या अभिनेत्रींनी नाकारला होता 'कुछ कुछ होता है'

कुछ कुछ होता है ला २१ वर्षे पूर्ण

'प्यार दोस्ती है … अगर वो मेरी सब से अच्छी दोस्त नहीं बन सकती, तो मैं उससे कभी प्यार कर ही नही सकता … क्यूंकी दोस्ती बिना तो प्यार होता ही नहीं ...',  'कुछ कुछ होता है' मधले यांसारखे  अनेक डायलॉग २० वर्षांनंतरही अनेकांच्या तितकेच लक्षात असतील. या चित्रपटातून 'प्रेमाचा त्रिकोण' ही संकल्पना दिग्दर्शक करण जोहरनं बॉलिवूडमध्ये रुजवली आणि ती यशस्वी करूनही दाखवली. 'अतिशय वाईट कथानक' असं सांगून नाकारलेला हा चित्रपट तेव्हाचा सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला. तब्बल २१ वर्षांनंतरही या चित्रपटाची प्रेक्षकांच्या मनावरची मोहीनी कायम आहे. 

अक्षयसाठी 'द कपिल शर्मा शो'मध्ये होणार हा सर्वात मोठा बदल

राणी मुखर्जी, काजोल आणि शाहरुख खान यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १६ ऑक्टोबर १९९८ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटातील राहुल, अंजली आणि टीना या त्रिकुटाची जादू  तरुणांच्या मनावर अजूनही आहे. विशेष म्हणजे चित्रपटासाठी करणनं आधी ऐश्वर्या राय बच्चन, उर्मिला मातोंडकर, तब्बू या त्यावेळच्या आघाडीच्या अभिनेत्रींना चित्रपटासाठी विचारलं होतं. 

...म्हणून स्वत:च्या लग्नात राधिकानं नेसली आजीची फाटलेली साडी

मात्र तिघींनी या चित्रपटासाठी नकार दिला होता. केवळ ऐश्वर्यानं  फोन करून नकार कळवण्याचं सौजन्य दाखवलं होतं असंही करणनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. या चित्रपटाचा भविष्यात कधी रिमेक झाला तर रणवीर सिंहनं शाहरूखची, आलिया भट्टनं काजोलची आणि जान्हवी कपूरनं राणी मुखर्जीनं साकारलेली भूमिका साकारावी अशी इच्छा करण जोहरनं व्यक्त केली.