पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कहो ना प्यार है' नंतर हृतिकला आल्या होत्या ३० हजार लग्नाच्या मागण्या

कहोना प्यार है

अभिनेता हृतिक रोशननं 'कहो ना प्यार है' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील हृतिकचा डबल रोल, गाणी तसेच अमिशा पटेल- हृतिक रोशन ही जोडी सुपरडुपर हिट ठरली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज वीस वर्षे उलटली आहे. एखाद्या कलाकाराचा पदार्पणाचा चित्रपट सुपरहिट ठरण्याची घटना क्वचितच घडते आणि हृतिक त्या नशिबवान कलाकारांपैकी एक समजला जातो. या २० वर्षांत प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल हृतिकनं सर्वांचे आभार मानले आहेत. हा चित्रपट जसा सुपरहिट ठरला तसेच या चित्रपटाशी निगडीत काही गोष्टीही तितक्याच रंजक आहेत चला तर पाहू अशाच काही रंजक गोष्टी

रजनीकांतच्या 'दरबार'नं चार दिवसांत कमावले इतके कोटी

- 'कहो ना प्यार है'  प्रदर्शित झाला आणि हृतिक रातोरात सुपरस्टार झाला. त्याची लोकप्रियता इतकी वाढली की त्यानंतर हृतिकला तब्बल ३० हजार लग्नाच्या मागण्या आल्या होत्या. हृतिकनं ही बाब स्वत: कबूल केली.

- 'कहो ना प्यार है' साठी पहिली पसंती  ही करिनाला होती. चित्रीकरण सुरु झाल्यानंतर करिनानं चित्रपटातून माघार घेतली. आश्चर्य म्हणजे एका लाँग शॉटमध्ये करिना दिसत होती. करिनानं ही  बाब स्वत: निदर्शनास आणून दिली. 

- 'कहो ना प्यार है' च्या नावाची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक पुरस्कार मिळाल्याचा रेकॉर्ड या चित्रपटाच्या नावे आहे.

दीपिकाच्या जेएनयू भेटीवर 'छपाक'च्या दिग्दर्शिका मेघना म्हणतात...

- या चित्रपटात अमिशा पटेलच्या आईनं देखील छोटीशी भूमिका साकारली आहे. तिनं हृतिकनं साकारलेल्या राज या श्रीमंत मुलाच्या आईची भूमिका केली होती. 

- हृतिकच्या एका हाताला सहा बोटं आहेत. ती लपवण्यासाठी हृतिकनं अनेक दृश्य हातात ग्लोव्हज् घालून चित्रीकरण केलं आहे.