पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमानच्या घरी बॉम्ब, १६ वर्षांचा मुलानं पोलिसांना दिली खोटी माहिती

सलमान खान

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या घरी बॉम्ब लपवण्यात आल्याची खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या १६ वर्षीय मुलाविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेश गाझियाबाद इथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलानं पोलिसांना मेल केली होती, ज्यात सलमानच्या वांद्रे इथल्या घरी बॉम्ब लावण्यात आला असून दोन तासांत त्याचा स्फोट होणार आहे, त्यामुळे हे थांबवायचं असल्यास त्वरीत हालचाल करा, असं या मेलमध्ये लिहिण्यात आलं होतं. 

ही ईमेल ४ डिसेंबरला मुंबई पोलिसांना पाठवण्यात आली होती. त्यानंतर सलमान खान, त्याचे कुटुंबीय आणि गॅलेक्सी इमारतीमधील इतर रहिवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह तातडीनं गॅलेक्सी इमारतीच्या दिशेनं धाव घेतली. सलमान खान त्याच्या घरी नव्हता, मात्र पोलिसांनी सलमानचे वडील सलीम खान त्याची आई आणि बहिणीला सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षित ठिकाणी हलिवले. 

प्रमोशनमधून वेळ काढत मेकअप मनच्या मुलाच्या लग्नात सलमानची उपस्थिती

त्यानंतर बॉम्ब शोधक- नाशक पथकानं जवळपास चार तास शोध घेतला. ' आम्ही सलमानच्या घरासह इमारतीचा प्रत्येक कानाकोपरा तपासला. तीन ते चार तास ही शोधमोहिम सुरु होती. त्यानंतर सलमानच्या कुटुंबियांना गॅलेक्सी इथल्या मूळ निवासस्थानी नेण्यात आलं' अशी  माहिती वांद्रे पोलिस स्थानकातील एका अधिकाऱ्यानं दिली. 

 पोलिसांना  आलेल्या मेलमधील माहिती ही पोकळ धमकी होती हे नंतर आमच्या लक्षात आलं. गाझियाबादमधल्या १६ वर्षांच्या एका मुलानं हा मेल पाठवला होता. संबधित मुलगा  हा कायदेविषयक शिक्षण घेत असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे, त्याचा मोठा भाऊदेखील वकील आहे. पोलिस शोध घ्यायला येतील या भीतीनं हा मुलगा तीस हजारी कोर्टात लपून बसला होता. 

पुण्यतिथी विशेष : '....जगण्याचं टायमिंग मात्र थोडंस चुकलं'

अखेर या मुलाच्या वकील भावाला विश्वासात घेऊन पोलिसांनी त्याला पकडलं. या मुलानं यापूर्वी जानेवारी महिन्यातही गाझियाबादमधील पोलिस स्थानकात खोटा मेल पाठवला होता.