पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार तब्बल १४० कलाकारांची फौज

प्रसाद नामजोशी, सागर वंजारी करणार चित्रपटाचं दिग्दर्शन

तब्बल १४० कलाकारांचा समावेश असलेला आगळावेगळा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक प्रसाद नामजोशी, सागर वंजारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.  'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' असं हटके नाव  या चित्रपटाचं असणार आहे. मराठीत आतापर्यंत कधीच न हाताळला गेलेला विषय आणि पुरेपूर मनोरंजन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 

अपूर्वा म्हणते, सगळीकडे अण्णा-शेवंताची चर्चा

प्रसाद नामजोशी यांनी यापूर्वी 'रंगा पतंगा', 'व्हिडिओ पार्लर' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. तर सागर वंजारीनं 'रेडू' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या दोघांच्याही चित्रपटांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. त्याशिवाय दोन्ही दिग्दर्शक राज्य पुरस्कार प्राप्त आहेत. त्यामुळे  इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी असं आकर्षक नाव असलेल्या या चित्रपटातून प्रेक्षकांना खूपच अपेक्षा आहेत. 

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी

इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हे नाव काय आहे, त्यात कलाकार-तंत्रज्ञ कोण आहेत या सगळ्याची उत्तरं टप्प्याटप्प्याने प्रेक्षकांना मिळतील. मात्र, मराठीत आतापर्यंत कधीच न हाताळला गेलेला विषय आणि पुरेपूर मनोरंजन प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. एप्रिलमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस आहे,' असं प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी सांगितलं.