पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NYIFF मध्ये मुंबईच्या सनी पवारला सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार

सनी पवार

मुंबईच्या कलिना येथील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सनी पवार या अकरा वर्षीय मुलाने १९व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार पटकावला आहे. ‘चिप्पा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट बाल  कलाकाराचा पुरस्कार देण्यात आला आहे. 

सनी पवार हा कलिना येथील कंची कर्वेनगर या झोपडपट्टीत राहतो. अभिनयाची  आवड असलेल्या  सनीनं २०१६ साली आलेल्या 'लायन' या चित्रपटातही  काम केलं होतं. ऑस्ट्रेलियन  दिग्दर्शक ग्रॅथ डेव्हिसनं या  चित्रपटाचं दिग्दर्शक केलं होतं. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील १९ व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमधून सर्वोत्कृष्ट बाल  कलाकाराचा  पुरस्कार पटकावून सनीनं  कौतुकाची थाप मिळवली आहे. या यशानंतर त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आई-वडिलांना अभिमान वाटेन असं काम मला करायचं  आहे. हा  पुरस्कार मिळाल्यानं मी खूपच खूश आहे. मला रजनीकांत सारखं सुपरस्टार व्हायचं आहे, असं एएनआय या वृत्तवाहिनीशी साधलेल्या संवादात सनी म्हणाला. हा पुरस्कार पटकावल्याचा आनंदही त्यानं व्यक्त केला आहे. बॉलिवूडच नाहीतर हॉलिवूडमध्येही काम करण्याची इच्छा सनीनं बोलून  दाखवली आहे. 

याच फिल्म फेस्टिव्हलमध्ये आदित्य कोठारेला पाणी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट  अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. प्रियांका चोप्राच्या 'पर्पल पेबल' या निर्मिती कंपनीअंर्तगत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. अभिनयात आपली ओळख निर्माण करणाऱ्या आदिनाथनं या चित्रपटातून पहिल्यांदाच दिग्दर्शकाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवलं.  पाण्याच्या भीषण समस्येवर प्रकाश टाकणारा ‘पाणी’ हा चित्रपट मराठवाड्यातील सत्य घटनेवर आधारित आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:11 yr old Sunny Pawar won the Best Child Actor award at the 19th New York Indian Film Festival 2019 for the film Chippa