मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिनेत्रींचे मागून किंवा चुकीच्या पद्धतीने फोटो काढणं थांबवा! पापाराझींवर संतापला मराठमोळा अभिनेता

अभिनेत्रींचे मागून किंवा चुकीच्या पद्धतीने फोटो काढणं थांबवा! पापाराझींवर संतापला मराठमोळा अभिनेता

May 22, 2024 12:57 PM IST

मराठी अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पापाराझींना फटकारले आहे. अभिनेत्रीचे चुकीच्या पद्धतीने फोटो काढणं थांबवा, असं त्याने म्हटलं आहे.

अभिनेत्रींचे मागून किंवा चुकीच्या पद्धतीने फोटो काढणं थांबवा! पापाराझींवर संतापला मराठमोळा अभिनेता
अभिनेत्रींचे मागून किंवा चुकीच्या पद्धतीने फोटो काढणं थांबवा! पापाराझींवर संतापला मराठमोळा अभिनेता

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रींचे विचित्र, डीपफेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. मात्र, कलाकारांनाही आता यावर थेट भाष्य करायला सुरुवात केली आहे. कलाकार देखील यावर व्यक्त होताना दिसतात. आता मराठी अभिनेता पुष्कर जोग याने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पापाराझींना फटकारले आहे. अभिनेत्रीचे चुकीच्या पद्धतीने फोटो काढणं थांबवा, असं त्याने म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बॉलिवूड असो किंवा इतर कुठली इंडस्ट्री, सेलिब्रिटींचे पार्टी, विमानतळ आणि जिमपर्यंचे फोटो काढण्यासाठी पापाराझी त्यांच्या मागे धावत असतात. पहिला फोटो काढण्याच्या नादात हे पापाराझी कलाकारांचे असे फोटो काढतात, जे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. मात्र, अनेकदा या फोटोंचा अँगल चुकलेला असतो. यामुळे सेलिब्रिटी पापाराझींवर भडकताना देखील दिसतात. काहीवेळा तर अभिनेत्रींचे मुद्दामहून असे फोटो काढले जातात की, त्यामुळे त्यांच्या उप्प्स मुमेंट सोशल मीडियावर चर्चेत येतात. यावरच मराठमोळ अभिनेता पुष्कर जोग याने पोस्ट लिहिली आहे.

ट्युमरने त्रस्त असलेल्या राखी सावंतला मिळाली जीवे मारण्याची धमकी; तरीही तक्रार केली नाही! कारण काय?

पुष्कर जोग म्हणतो...

‘बिग बॉस मराठी’सह अनेक चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता पुष्कर जोग हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. #जोगबोलणार म्हणत अनेकदा तो आपल्या मनातील भावना सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याची बिंधास आणि बेधडक शैली त्याच्या चाहत्यांना देखील आवडते. यावेळेस त्याने महिला कलाकारांचे चुकीच्या पद्धतीने काढले जाणारे फोटो यावर भाष्य केलं आहे. अनेकदा महिला कलाकारांचे फोटो अतिशय चुकीच्या अँगलने काढले जातात, यावर त्याने आपलं रोखठोक मत मांडला आहे. आपल्या पोस्टमध्ये पुष्कर जोगने लिहिके की, ‘पापाराझींनी महिला कलाकारांचे मागून किंवा चुकीच्या पद्धतीने फोटो आणि व्हिडीओ काढणं कृपया थांबवलं पाहिजे. अशा प्रकारचे फोटो काढल्यानंतर महिला कलाकारांना अस्वस्थ वाटत असतं. त्यांचा आदर करा. कृपया असे फोटो काढू नका. हे खरंच खूप बेसिक मॅनर्स आहेत. सगळ्यांना सन्मानाने राहू द्या.’

अभिनेत्रींनी व्यक्त केली नाराजी!

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेकदा पाहतो की, कलाकारांचे व्हिडीओ आणि फोटो पापाराझींद्वारे शेअर केले जातात. काही व्हिडीओ आणि फोटोंमध्ये जाणूनबुजून अभिनेत्रींच्या प्रायव्हेट पार्ट्सवर झूम करून त्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नोरा फतेही हिने देखील पापाराझींना फटकारलं होतं. या आधी आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, मृणाल ठाकूर, पलक तिवारी यांनी देखील पापाराझींना चुकीच्या अँगलने फोटो काढण्यास मनाई केली होती.

टी-२० वर्ल्डकप २०२४