Madhuri Dixit House : निळ्याशार समुद्राचा शेजार लाभलेलं आपल्या माधुरीचं ४८ कोटींचं घर आहे तरी कसं? पाहा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Madhuri Dixit House : निळ्याशार समुद्राचा शेजार लाभलेलं आपल्या माधुरीचं ४८ कोटींचं घर आहे तरी कसं? पाहा व्हिडिओ

Madhuri Dixit House : निळ्याशार समुद्राचा शेजार लाभलेलं आपल्या माधुरीचं ४८ कोटींचं घर आहे तरी कसं? पाहा व्हिडिओ

Oct 29, 2024 04:01 PM IST

Madhuri Dixit House Inside : अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचा पती श्रीराम नेने मुंबईच्या एका उंच इमारतीत ५३व्या मजल्यावर राहतात. त्यांचे घर अतिशय आलिशान आहे.

Madhuri Dixit's home features MF Husain's Dancing Women, 1995, and his other artwork. (Pics courtesy: Architectural Digest India/Talib Chitalwala)
Madhuri Dixit's home features MF Husain's Dancing Women, 1995, and his other artwork. (Pics courtesy: Architectural Digest India/Talib Chitalwala)

Madhuri Dixit House Inside Photos: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षित तिच्या मधाळ सौंदर्याने नेहमीच सगळ्यांना घायाळ करते. आजही अभिनेत्रीची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. गेले काही वर्ष परदेशात राहिल्यानंतर आता माधुरी पुन्हा मायदेशी परतली आहे. माधुरीने मुंबईतच आलिशान घर खरेदी करून ते अतिशय सुंदर पद्धतीने सजवले आहे. बॉलिवूडच्या या सुंदर अभिनेत्रीचं घर आतून कसं दिसत असेल, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. आता माधुरीच्या सुसज्ज घराचे इनसाईड फोटो समोर आले आहेत.  

माधुरी दीक्षितच्या मुंबईतील या घरात काचेच्या मोठमोठ्या खिडक्या आहेत, ज्यामुळे प्रत्येक खोलीत प्रकाश पसरतो.  हा सोनेरी प्रकाश आणि हवेशीर वातावरण तिच्या घराला आणखी सुंदर बनवतं. आर्किटेक्चरल डायजेस्ट इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या मुंबईतील अपार्टमेंटची आतून झलक दाखवली. माधुरीच्या घरात प्रसिद्ध कलाकार दिवंगत एम. एफ. हुसेन यांच्या कलाकृती केंद्रस्थानी आहे. मनी कंट्रोलच्या २०२२च्या अहवालानुसार, ४८ कोटी रुपयांची मालमत्ता इंडियाबुल्स ब्लू प्रकल्पात आहे आणि सप्टेंबर २०२२मध्ये ती नोंदणीकृत करण्यात आली आहे. मुंबईच्या लोअर परळमध्ये असलेल्या या हवेशीर अपार्टमेंटमधून समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. माधुरीचे हे घर ५,५०० चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे.

माधुरीच्या घरात कलेला विशेष स्थान

माधुरी एम. एफ. हुसेन यांची प्रेरणा होती.  त्यांनी खास माधुरीसाठी रंगवलेली त्यांची चित्रे आता अभिनेत्रीच्या घरात एका विशेष स्थानी आहेत. या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करताच विक्रम गोयल यांच्या विया होमचा आकर्षक कंसोल, एम. एफ. हुसेन यांचा गणपती, आणि एक सुंदर कार्पेट तुमचे स्वागत करते. या घरात आणखी पुढे गेल्यावर एमएफ हुसेन पेंटिंग ‘डान्सिंग वुमन’ ही डायनिंग एरियाची शोभा वाढवताना दिसते. समोरच दिवाणखान्यातून पुढे स्टायलिश बार आहे. दिवाणखान्यात निळा सोफा, गोल कॉफी टेबल आणि न्युट्रल रंगांच्या आरामखुर्च्या  आहेत. तर, मागे गडद वॉलपेपर आहे.

Fitness Tips: काय आहे माधुरी दीक्षितच्या चिरतरुण सौंदर्याचं रहस्य? पती डॉ. नेनेंनी अखेर केला खुलासा

२००० साली दिवंगत चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या 'गज गामिनी' या चित्रपटात माधुरी दीक्षितने काम केले होते. माधुरीने आर्किटेक्चरल डायजेस्ट इंडियाशी बोलताना सांगितले की, ‘हुसेनजींना माझ्या घराच्या भिंती रंगवायच्या होत्या, पण मी इथून दुसरीकडे स्थायिक होणार असल्याने नकार दिला होता. म्हणून मग त्यांनी मला त्यांच्या काही उत्कृष्ट कलाकृती दिल्या. त्यांनी वापरलेले रंग मला फार आवडतात.’

डिझाइन आणि सजावटीमागची कल्पना

हे घर माधुरी आणि तिच्या कुटुंबाच्या संगीत, रंगभूमी, कला आणि तंत्रज्ञानावरील प्रेमाची सांगड घालते. या घरात एका भव्य प्रोजेक्टरसह होम थिएटरपासून ते चील करण्यासाठी स्लीक बार आणि गिटार, ड्रम आणि पियानोसह समर्पित संगीत खोली देखील आहे. माधुरीच्या अत्याधुनिक घराची रचना ‘लिथ डिझाइन’च्या आर्किटेक्ट अपूर्वा श्रॉफ यांनी केली आहे.

Whats_app_banner