मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: सागरला झाली अटक, स्वातीला झाला पश्चाताप! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रंजक वळण

Premachi Goshta: सागरला झाली अटक, स्वातीला झाला पश्चाताप! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रंजक वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 03, 2024 01:13 PM IST

Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आता सागला अटक झाली आहे. त्यामुळे आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया...

Premachi Goshta:  'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रंजक वळण
Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रंजक वळण

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी आणि हर्षवर्धन हे सागर-मुक्ताच्या मागे हात धुवून लागले आहेत. ते सतत काही ना काही नवे डाव आखताना दिसत आहेत. आता तर त्यांनी असा काही डाव आखला आहे की सागरला थेट तुरुंगात जावे लागणार आहे. त्यामुळे चला जाणून घेऊया प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

ट्रेंडिंग न्यूज

स्वातीने विचारले कार्तिकला कारण

सागरला फसवण्यासाठी कार्तिकने स्वातीचा वापर केला आहे. एका बॅगेत सोनं आणि रोकड असलेली बॅग स्वातीकडे दिली. स्वातीने ही बॅग अडगळीच्या खोलीत ठेवली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकताच त्यांना ही बॅग मिळाली आहे. त्यामुळे सागरला अटक झाली आहे. त्यानंतर इंद्रा, बापू, मिहिर आणि मुक्ता त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कार्तिकने असा का केले याचा जाब ती विचारते. तेव्हा कार्तिक हर्षवर्धनने मला हे करायला सांगितले असे सांगतो. तो कसे बसे स्वातीला समजावतो. पण स्वाती या सगळ्याला कार्तिकला जबाबदार ठरवते. कार्तिक स्वातीला इमोशनली ब्लॅकमेल करतो. पण स्वाती यावेळी त्याचे काहीच न ऐकता तेथून निघून जाते.
वाचा: मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही; "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील"चा ट्रेलर प्रदर्शित

सावनीचं सेलीब्रेशन

कार्तिकने सगळा प्लान यशस्वी केल्यामुळे हर्षवर्धन आणि सावनीचा डाव यशस्वी झाला आहे. त्यामुळे सावनी, कार्तिक आणि हर्षवर्धन हे एकत्र बसून सेलीब्रेशन करताना दिसतात. त्यावेळी कार्तिक स्वाती त्याच्याशी काय काय बोलली हे सांगितले. तर दुसरीकडे हर्षवर्धनने कार्तिकला त्याच्या बिझनेसमध्ये पार्टनर केले आहे. ते ऐकून कार्तिक खूश होतो.
वाचा: दाक्षिणात्य अभिनेत्याने शेजारी उभ्या असलेल्या अभिनेत्रीला दिला धक्का, Viral Videoने वेधले सर्वांचे लक्ष

मुक्ताला कळाले सत्य

पहिले मुक्ताचे लायसन्स रद्द झाले आणि त्यानंतर सागर तुरुंगात गेला. मुक्ता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. हे सगळं कुणी तरी मुद्दाम केले असल्याचे मुक्ताला भासते. ती शांत बसून विचार करत असते. या सगळ्याच्या पाठीमागे सावनीतर नाही ना असा प्रश्न मुक्ताला पडतो. ती सावनीशी बोलायचा विचार करते. तेवढ्यात मिहिर येतो आणि सगळ्यांशी बोलतो. लग्न पुढे ढकलायं बोलत असतो. पण सागरने फोन करुन मुक्ताला हे लग्न पुढे जाता कामा नये असे सांगतो. ते ऐकून सर्वांना धक्का बसतो. आता मालिकेत पुढे काय होणार? स्वाती तिची चूक मान्य करणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. येत्या काळात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.
वाचा: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्रीवेडिंगमधील पहिला व्हिडीओ आला समोर, 'बॅकस्ट्रीट बॉईज'चा धम्माल परफॉर्मन्स

टी-२० वर्ल्डकप २०२४