मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कलामुळे मिळाली अद्वैतला डील, काय घडणार 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात

कलामुळे मिळाली अद्वैतला डील, काय घडणार 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात

Aarti Vilas Borade HT Marathi
May 27, 2024 03:17 PM IST

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया...

laxmichya paulanni: कलामुळे मिळाली अद्वैतला डील
laxmichya paulanni: कलामुळे मिळाली अद्वैतला डील

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेतील अद्वैत आणि कला ही जोडी सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. आता नैना आणि राहुलच्या लग्नानंतर काही गोष्टी बदलल्या आहेत. कलावर आणखी संकट कोसळले आहे. पण कला जराही न डगमगता सगळ्या गोष्टींना समोरी जात असते. अद्वैतला त्याच्या कामात मदत करावी म्हणून कलाने मेहनत घेतली आहे. चला जाणून घेऊया 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय होणार...

ट्रेंडिंग न्यूज

कलाने काढले नवे डिझाइन

ब्रह्मनाथन या उद्योगपतीसोबत अद्वैतची एक बिझनेस मिटिंग असते. पण अद्वैतने सादर केलेले एकही डिझाइन त्यांना आवडत नाहीत. शेवटी कला अद्वैतची मदत करायला पुढे सरसावते. ती रात्रभर बसून नवे डिझाइन काढते. पण याची अद्वैतला जराही भनक लागू देत नाही.
वाचा: कोण आहे संजय लीला भन्साली यांची बहिण बेला सेहगल आणि शर्मिनची आई? वाचा

नैना आणणार कलाच्या कामात अडथळा

कलाला आज ऑफिसमध्ये ब्रह्मनाथन यांच्यासोबत होणाऱ्या मिटिंगसाठी चांदेकरांच्या ऑफिसमध्ये जायचे असते. त्यामुळे ती सकाळी लवकर उठून स्वयंपाक करते. कला घरातील इतर कुटुंबीयांना मी आज आराम करण्यासाठी लवकर काम केल्याचे सांगते. नैना हे ऐकते आणि कलाला त्रास देण्याचे ठरवते. ती सतत कलाला काही तरी काम सांगत असते. पण कलाही तिच्याकडे दुर्लक्ष करुन तेथून पळत ऑफिसमध्ये जाते.
वाचा: आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे रंगभूमीवर पहिल्यांदा एकत्र, 'या' नाटकात साकारणार भूमिका

खरेंवर कोसळले आर्थिक संकट

आधीच्या लग्नासाठी आणि आता नैनाच्या लग्नासाठी कलाच्या आई-वडीलांनी कर्ज घेतलेले असते. त्याचा हफता न दिल्यामुळे ते खरेंच्या घरी येतात. ते कलाच्या आईला हफ्ते का भरले नाहीत असे विचारतात. पण त्या मुदत मागत असल्यामुळे शेवटी कलाची गाडी ते उचलून घेऊन जातात.
वाचा: बॉलिवूड कलाकारांवरही भारी पडली मराठमोळी छाय कदम, 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये झाले 'या' सिनेमाचे स्क्रिनिंग

कलामुळे अद्वैतला मिळाली डील

कला रात्रभर बसून डिझाइन काढते आणि अद्वैतला कळून न देताच ऑफिसमधील मुलीकडे डिझाइन देते. ब्रह्मनाथन आल्यानंतर ती मुलगी कलाने काढलेले डिझाइन देते. त्यांना ते आवडतात आणि ते डील मान्य करतात. आता अद्वैतला जेव्हा कळेल की ही डिझाइन कलाने बनवल्या आहेत तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४