Premachi Goshta: आरतीने लकीशी लग्न करण्यास दिला नकार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: आरतीने लकीशी लग्न करण्यास दिला नकार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

Premachi Goshta: आरतीने लकीशी लग्न करण्यास दिला नकार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 03, 2024 01:58 PM IST

Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. या मालिकेत आता आरतीने लकी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Premachi Goshta
Premachi Goshta

Premachi Goshta Update: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'प्रेमाची गोष्ट.' सध्या मालिकेत लकीचे प्रकरण समोर आले आहे. मुक्ताच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या आरतीच्या पोटात लकीचे बाळ असते. पण लकी त्या बाळाला नाव देण्यास नकार देतो. आता मुक्ता आरतीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. पण या सगळ्यात सावनी आरतीचे कान भरते. त्यामुळे आरती लकीने जे केले त्याची शिक्षा मिळायला हवी असे ठरवते.

आरतीने केली लकी विरोधात तक्रार

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागर लकीशी आरतीचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतो. इंद्रा देखील सागरला या निर्णयामध्ये पाठिंबा देते. पण या सगळ्या गोष्टी इतक्या सुरळीत कशा पटकन होत आहेत हे पाहून सावनीचा जळफळाट होतो. सावनी नवा प्लान आखते. ती आरतीच्या घरी जाते. तिला लकी आणि मुक्ता विरोधात भडकवते. तसेच पोलिसात तक्रार करण्यास प्रोत्साहन देते. आरती देखील सावनीच्या डावाला बळी पडते. त्यामुळे ती लकी विरोधात तक्रार करते.

आरतीची नोटीस आली कोळी कुटुंबीयांच्या घरी

कोळी कुटुंबीय एकत्र बसून लकीने जे काही केले त्यावर मार्ग शोधत असतात. सागर आणि मुक्ता आरतीशी लकीचे लग्न लावून देण्याचा विचार करत असतात. पण इंद्रा या सगळ्याला नकार देते. ती लकीची बाजू घेते. सागर आईच्या विरोधात उभा राहातो. तो लकीने जे केलय त्याची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे असे बोलून निघून जातो. तसेच इथून पुढे लकीला कोणत्याही प्रकारची मदत करणार नसल्याचे तो सांगतो.
वाचा: तोंडाला रुमाल बांधलेल्या सूरजला हॉटेलमध्ये मिळत नव्हती एण्ट्री, रुमाल काढताच गर्दी जमली अन्...

मुक्ता गेली आरतीला समजवायला

आरतीने लकी विरोधात तक्रार ही सावनीच्या सांगण्यावरुन केली आहे. सावनी सतत आरतीचे कान भरत असते. त्यामुळे मुक्ता जेव्हा आरतीला समजावण्यासाठी जाते तेव्हा ती मुक्ताचे काहीही ऐकायला तयार नसते. ती मुक्ताला थेट सांगते मला लकीशी लग्न करायचे नाही. त्याने जे काही केले त्याची शिक्षा मी देणार. आता मुक्ताला कळणार का सावनीमुळे आरतीने तक्रार केली आहे? सावनीचे सत्य सर्वांसमोर येणार का? आरतीला सावनीचे सत्य कळणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मालिकेत मिळणार आहेत. मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

Whats_app_banner