'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजचा भाग पाहण्यासाठी खरं तर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सागरने आदित्यचे सत्य सर्वांना सांगितले आहे. माधवी आणि पुरुला ते ऐकून धक्का बसला आहे. पण दोघांनीही त्याला माफ केले आहे. हे सगळं पाहून आदि भारावतो. पण सावनी आणि हर्षवर्धन एक नवा डाव आखतात. त्यामुळे मुक्ताचे मोठे नुकसान होते.
सागर आदित्यला सावनीच्या घरी जाऊन घेऊन येतो. त्याला माधवी आणि पुरुषोत्तम यांची माफी मागायला लावतो. आदित्य घाबरलेला असतो. तो माफी तर मागतो पण तुरुंगात जाव लागणार नाही ना अशी भीती त्याला वाटत असते. माधवी त्याला माफ तर करते पण चांगलच ऐकवते देखील.
वाचा: भाऊ, पाय पुरतात का?; नवी गाडी खरेदी केल्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे झाला ट्रोल
माधवी आदित्यला समजावते की वयाची १८ वर्ष पूर्ण आणि प्रशिक्षण घेतल्याशिवाय गाडीला हात लावायचा नाही. माझी काहीच तक्रार नाहीये आता. कारण आदित्य हा सागरचा मुलगा आहे. सई तसा आदित्य. त्यामुळे मी त्याला काही शिक्षा देणार नाही. पण नंतर सागर आदित्यला शिक्षा देतो. त्याला दररोज आजीच्या मदतीसाठी तुला इथे यावं लागेल असे सांगतो. आदित्यला देखील ती शिक्षा मान्य असते.
वाचा: अरे हाय काय अन् नाय काय;'गेला माधव कुणीकडे' नाटक पुन्हा पाहायचे? मग ही बातमी नक्की वाचा
इंद्रा आणि स्वातीचा दोघींचाही विश्वास बसत नाही की आदित्यने हा अपघात घडवून आणला आहे. त्या सागरला विचारतात. तेव्हा सागर हे सगळं खरं असल्याचे सांगतो. तसेच माधवी हे सगळं विसरुन मिहिका आणि मिहिरच्या लग्नासाठी तयार झाल्याचे देखील सांगतो. ते ऐकून इंद्रा खूश होते. पण लग्न आमच्या पद्धतीने होईल असे बोलते.
वाचा: 'मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा', मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक
माधवी गोखलेच्या घरी काय झाले हे आदित्य सावनीला सांगत असतो. पण तेवढ्यात पोलीस घरी येतात आणि आदित्यला अटक करायला आलो आहोत असे सांगतात. मुक्ता कोळींनी तक्रार दाखल केली असल्याचे पोलीस सांगतात. सावनी त्यांच्यासमोर हातापाया पडते आणि आदित्यला अटक न करण्यास सांगते. या सगळ्या प्रकारामुळे आदित्य दुखावला जातो. आदित्यच्या मनात पुन्हा एकदा मुक्ताबद्दल रोष निर्माण होतो. सावनीच्या घरात आलेले पोलीस हे खोटे असतात. सावनी आणि हर्षवर्धन यांनीच हे खोटे पोलीस आणलेले असतात.
संबंधित बातम्या