'प्रेमाची गोष्ट' मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील मुक्ता, सागर, इंद्रा, स्वाती, लकी, माधवी, मिहिका, सावनी, आदित्य, सई प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. मालिकेत सर्व काही सुरळीत होत असतान एक नवा ट्विस्ट आला आहे. लकीने एक नवे कांड केले आहे. तो आरतीच्या पोटात वाढत असलेल्या बाळाचा बाप असतो. पण तो ते मान्य करायला तयार नसतो. मुक्ताला सर्वजण खोटे ठरवतात. पण आता मुक्ताने लकीचे सत्य सर्वांसमोर आणले आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेची सुरुवात ही इंद्रा पाय मुरगळून घरात पडल्याने होते. मुक्ता सासूबाईंना हात देऊन मदत करते. त्यानंतर त्यांना सोफ्यावर बसवते. मुक्ता तेल गरम करुन आणते आणि इंद्राच्या पायला लावायला जाते. पण ती नकार देते. तेवढ्यात सागर येतो. तो मुक्ताच्या हातातून तेल खेचून घेतो आणि आईच्या पायाला लावतो. इंद्राला थोडे बरे वाटते.
मुक्ताचा हट्ट असतो की लकीची डीएनए टेस्ट करायची. त्यामुळे सागर तयार होतो. सागरचा लकीवर पूर्ण विश्वास असतो की आरतीच्या पोटात वाढत असलेले बाळ हे त्याचे नाही. त्यासाठी तो आरतीला वाटेल तसे बोलतो. मुक्तावरही चिडतो. शेवटी डीएनए रिपोर्ट्स समोर येतो. ते रिपोर्ट्स निगेटीव्ह आल्यामुळे सागरला आनंद होतो. सागर मुक्ताला चांगलेच सुनावतो. तसेच आरतीला कामावरुन काढण्यास सांगतो. मुक्ता शांत बसून सर्व ऐकत असते. पण यामध्ये काही तरी चुकीचे घडत आहे असे मुक्ताला जाणवते.
सावनीने हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मुलीला सांगितले असते की रिपोर्ट्स आले की सांग. सावनी त्या मुलीला थोडे पैसे देते आणि रिपोर्ट्स आदलाबदली करायला सांगते. त्यामुळे कोळी कुटुंबीयांना दाखवण्यात आलेले रिपोर्ट्स हे सावनीने बदललेले असतात.
वाचा: २९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा आहे तरी काय?
मुक्ता आशूला घडलेला प्रकार सांगते. त्यानंतर आशू जाऊन त्या डॉक्टरांची भेट घेतो. तो डॉक्टरांना सत्य विचारतो. तेव्हा त्याला कळते की रिपोर्ट्स हे बदलण्यात आले आहेत. मुक्ता थेट डॉक्टरांना घेऊन घरी पोहोचते. ते डॉक्टर जे काही सत्य आहे ते सांगतात. ते ऐकून सागर आणि कुटुंबातील सर्वांनाच धक्का बसतो. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.