'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी तिच्या लग्नासाठी गोखले आणि कोळी कुटुंबीयांकडे राहायला आली आहे. ती आल्यानंतरही शांत बसलेली नाही. मुक्ताच्या आयुष्यात सतत धवळाधवळ करत असते. सागर तिला योग्य वेळी योग्य उत्तरे देताना दिसतो. पण आता या सगळ्याचा परिणाम मुक्ताच्या प्रकृतीवर झाल्याचे दिसत आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग दाखवण्यात आला होता. मुक्ताने सागरच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केला. पण सावनी मात्र, मुक्ताची वटपौर्णिमा कशी खराब होईल याचा विचारत होती. तिने वडाला फेऱ्या मारताना वापरण्यात येणारा धागाच तोडला आहे. मुक्ता जेव्हा वडाला फेऱ्या मारते तेव्हा तो धागा तुटतो. सागर येतो आणि तो धागा हातात पकडतो. त्यानंतर मुक्ता तिची पूजा पूर्ण करते आणि अचानक ती बेशुद्ध पडते.
वाचा: सेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत; ‘ठरलं तर मग’मधील सहाय्यक दिग्दर्शकाच्या निधनानंतर जुई गडकरीची पोस्ट
मुक्ता बेशुद्ध पडल्यामुळे सर्वांची धावपळ होते. तिला तातडीने घरी घेऊन जातात. डॉक्टरांना बोलवण्यात येते. तेव्हा डॉक्टर सांगतात की मुक्ताला दोन तासात शुद्ध नाही आली तर दवाखान्यात अॅडमिट करावे लागेल. तसेच तिचा जुना आजार पुन्हा होण्याची शक्यता आहे असे देखील डॉक्टर बोलताना दिसतात.
वाचा: 'अभिनेत्रीच्या ओठांचा कुत्र्याने घेतला चावा', रिअॅलिटीशोमध्ये सांगितला भीतीदायक प्रसंग
मुक्ता शुद्धीवर येत नसल्यामुळे सागर घाबरला आहे. त्याला रडू कोसळले आहे. ते पाहून सावनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. पण सरळ भाषेत समजावले तर ती सावनी कसली. उलट तिच्या बोलण्यावर सागर चिडतो आणि पुन्हा तिलाच सुनावतो. सावनीला ते ऐकून प्रचंड राग येतो. सागर सावनीला तिने सोडलेल्या उपवासाची आठवण करुन देतो. ते सगळं ऐकून सावनी चिडून तेथून निघून जाते.
वाचा: मल्लिकाजान मनीषा कोईरालाकडून सोनाक्षी सिन्हाला मिळाले मोठे गिफ्ट, जाणून घ्या काय मिळाले
मुक्तासाठी सागर एकवीरा देवीकडे साकडं घालतो. हातात दिवा घेऊन देवी पुढे उभा राहातो. आई एकवीरा त्याचे म्हणणे ऐकते. मुक्ता तेवढ्यात शुद्धीवर येते. स्वाती पळत जाऊन सागरला सांगते. सगळेजण आनंदी होतात. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या