मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  हर्षवर्धनने आखला नवा प्लान, सावनीला पत्नी म्हणून स्थान नाहीच! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

हर्षवर्धनने आखला नवा प्लान, सावनीला पत्नी म्हणून स्थान नाहीच! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 18, 2024 03:57 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या हर्षवर्धन आणि सावनीच्या लग्नाची तयारी सुरु आहे. पण हर्षवर्धन सावनीला बायको म्हणून स्वीकारण्यास तयार नसतो. आता त्याने नवा काय प्लान आखला आहे चला पाहूया...

premachi goshta: मालिकेत मुक्ता आणि सागर काय करणार
premachi goshta: मालिकेत मुक्ता आणि सागर काय करणार

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या सावनी आणि हर्षवर्धन यांच्या लग्नाचे कथानक सुरु आहे. सावनी हर्षवर्धनच्या प्रेमात वेडी असली तरी हर्षवर्धन मात्र सावनीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास तयार नाही. त्याला हे लग्न करायचे नसते. पण सावनी त्याला धमकी देते जर तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुला उद्धवस्त करेन. म्हणून हर्षवर्धन तिच्याशी लग्न करायला तयार झाला आहे. दरम्यान, पुन्हा हर्षवर्धनने नवा प्लान आखला आहे.

आदित्यने बाबा म्हणायला नकार दिल्याने हर्षवर्धन चिडला

हर्षवर्धन सावनीला भेटायला गोखलेंच्या घरी आलेला असतो. तेवढ्यात आदित्य तेथे येतो आणि हर्षवर्धन त्याला मला पप्पा म्हण असे सांगतो. त्यावर आदित्य मी फक्त माझ्या सागर पप्पांना पप्पा म्हणणार असे बोलतो. ते ऐकून हर्षवर्धनला राग येतो. तो सावनीवर चिडतो, आपल्याला जे होण्याची भीती वाटत होती आता तेच होताना दिसत आहे. हर्षवर्धनने सावनीला म्हणतो की, "तुझे आदित्यकडे काहीच लक्ष नाही. आदित्य हा सागरच्या जवळ जात आहे. त्याने मला पप्पा म्हणून हाक मारण्यास नकार दिला. असेच सुरू राहिले तर तोही दुरावेल. आपल्या हातात काहीच राहणार नाही." त्यावर सावनी हर्षवर्धनला समजावते. तू मूड खराब करु नकोस, मी समजावते त्याला असे ती बोलते.
वाचा: गौरव मोरेचा ‘अल्याड पल्याड’ चित्रपट कसा आहे? जाणून घ्या प्रेक्षकांकडून

सागरने घालवला कुटुंबासोबत वेळ

'प्रेमाची गोष्ट' मालिकेची सुरुवात ही सागर, मुक्ता, सई आणि आदित्य एकत्र असल्याने होते. सई आणि आदित्य हे एकत्र क्रिकेट खळत असतात. त्यावेळी सागरही तेथे येतो आणि त्यांच्यासोबत खेळत असतो. मुक्ता त्यांना एकत्र खेळताना आनंदी होते. सागर मुक्ताला देखील क्रिकेट खेळण्यास बोलावतो. चौघे मिळून एकत्र छान वेळ घालवतात. मुक्ताला आदित्य सागरसोबत वेळ घालवत असल्याचे पाहून आनंद होतो.
वाचा: 'भारतात २०१४मध्ये पाकिस्तानी अभिनेत्याची प्रचंड क्रेझ होती', रत्ना पाठक यांनी सांगितला किस्सा

ट्रेंडिंग न्यूज

हर्षवर्धनने आखाल नवा प्लान

सावनीसोबतच्या लग्नाच्या विचाराने हर्षवर्धन चिंतेत असतो. सावनीचे प्रेम हे कडक कॉफीसारखे झाले असून ती आंधळ्या प्रेमात असलेल्या नव्या जोडप्यांसारखी वागत आहे असे तो म्हणतो. तसेच त्याने कमावलेली संपत्ती एका झटक्यात तिला द्यावी लागेल असा विचार त्याच्या डोक्यात येतो. शेवटी हर्षवर्धन वकीलांना फोन करतो आणि नवे कागदपत्र तयार करायला सांगतो. या कागदपत्रांमध्ये सावनीचा हर्षवर्धनच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नसल्याचा मायना तयार करतो. त्यावर आता सावनीची सही घ्यायची असते. त्यामुळे होणारे लग्न देखील लग्न राहणार नाही असा विचार हर्षवर्धन करतो.
वाचा: बाप आणि लेकीचं हळवं नातं टिपणाऱ्या 'द्विधा' चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित

WhatsApp channel