Premachi Goshta Serial Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सतत काही ना काही सुरु असते. कधी सावनी नवे डाव आखत असते, कधी लकी चुका करत असतो तर कधी सागर-मुक्ताच्या आयुष्यात वादळ येत असते. काही दिवसांपूर्वी 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ताचा मित्र आशयची एण्ट्री झाली. तेव्हा पासून मालिकेत एक नवा ट्रॅक सुरु झाला आहे. सागरला मुक्ता आणि आशयच्या मैत्रीचा त्रास होताना दिसत आहे. त्यातच सावनी आणखी भर घालते. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया...
प्रेमाची गोष्ट मालिकेची सुरुवात ही मुक्ता सर्वांसाठी स्वयंपाक करत असताना होते. सावनी सतत घरातून आत-बाहेर फेऱ्या मारताना दिसते. आता सावनीचं नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न मुक्ताला पडतो. तेवढ्यात इंद्रा येते आणि सागरचे जेवण बनवू नको असे सांगते. त्यावर मुक्ता आणखीच चिडते. त्यानंतर सई बाहेर येते. ती मुक्ताकडे तिचा मोबाईल मागते. सईला सागरसाठी ग्रिटींग बनवायचे असते. त्यासाठी आयड्या पाहण्यासाठी सई मुक्ताचा मोबाईल घेते. तेवढ्या आशयचा फोन येतो. तो पाहून सई मुक्ताला सांगत असते की माझ्या मैत्रिणीचे नाव आशिता आहे. मी तिला पण आशूच आवाज देते.
सावनी सतत सागर आणि मुक्ताच्या नात्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असते. ती त्यासाठी एकही संधी सोडत नाही. सईच्या हातात मुक्ताचा फोन पाहून सावनीच्या डोक्यात नवा प्लान सुरु होतो. ती सईला पेन आणण्याच्या बहान्याने खोलीत पाठवते आणि मुक्ताच्या फोनमधील आशूचा नंबर हा आशिता म्हणून सेव्ह करते. त्यानंतर मुक्ता काम करत असताना तिचा फोन वाजत असतो. सागर आशिताचे नाव दाखवत असल्यामुळे फोन उचलतो. पण त्याला कळते हा आशूचा फोन आहे. मुक्ता खोट बोलत असल्याचे त्याला जाणावते. त्याला सुचत नाही काय करावे आणि काय नाही. शेवटची मिहिर त्याला एकदा बोलून घेण्याचा सल्ला देतो.
वाचा: परभणीतील सत्य घटनेवरील थरारक कथा, वाचा 'मानवत मर्डर'चा रिव्ह्यू
आशयचा फोन आल्यामुळे मुक्ता बिल्डींग खाली येते. आशय मुक्ताला आनंदाची बातमी सांगतो की लकीच्या प्रकरणाचा कोणताही परिणाम सागरला मिळत असलेल्या पुरस्कारावर होणार नाही. ते ऐकून मुक्ता आनंदी होते. ती आशयला मिठी मारते. तेवढ्यात सागर येतो. त्याला असे वाटते की मुक्ता त्याला फसवत आहे. ती आशयच्या प्रेमात आहे. तसेच सावनी या सगळ्या गोष्टी सागरच्या डोक्यात घालताना दिसते. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या