Premachi Goshta: सईवर हात उचलताच मुक्ताने सावनीला सुनावले, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय होणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: सईवर हात उचलताच मुक्ताने सावनीला सुनावले, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय होणार?

Premachi Goshta: सईवर हात उचलताच मुक्ताने सावनीला सुनावले, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय होणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 02, 2024 10:25 AM IST

Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी सतत मुक्ताला कमी लेखत असते. पण यावेळी मुक्ताने सावनीला इतके सुनावले आहे की प्रेक्षकांना आनंद झाला आहे.

premachi goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय घडणार?
premachi goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय घडणार?

'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. या मालिकेतील मुक्ता आणि सागरच्या जोडीने तर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मुक्ता आणि सागरने केवळ सईसाठी एकमेकांशी लग्न केले असते. पण आता त्या दोघांमध्ये प्रेम खुलताना दिसत आहे. चला पाहूया 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सावनीच्या मेहंदी कार्यक्रमाने होते. सावनीच्या मेहंदी कार्यक्रमाचे आयोजन हे मुक्ताचा घरी केलेले असते. सावनी हर्षवर्धनला तिची मेहंदी दाखवत असते. तेवढ्यात सईचा धक्का तिला लागतो आणि सगळी मेहंदी हर्षवर्धनच्या कपड्यांना लागते. हर्षवर्धन प्रचंड चिडतो. कुणी माझे स्वागत करायला इथे नाही, कुणी या मुलांना सांभाळायला नाही, काय चालय हे? असे बोलून तो तेथून निघून जातो.
वाचा : अशोक सराफ यांचा अनोखा लूक, 'लाईफलाईन' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

सावनीने उचलला सईवर हात

हर्षवर्धन चिडून निघून गेल्यामुळे सावनी चिडते. ती सईला तुला दिसत नाही का असे बोलत असते. ती सईवर हात उगारते. तेवढ्यात मुक्ता तेथे येते आणि तिचा पकडते. 'माझ्या मुलीवर हात उचलण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली' असा जाब ती सावनीला विचारते. सावनी काही न बोलता मुक्ताचे म्हणणे ऐकत असते. पुढे मुक्ता सावनीला म्हणते 'मी माझ्या मुलीशी मोठ्या आवाजात बोलले नाही आणि तुम्ही तिच्यावर हात उचलायची हिंमत कशी केली.' हे सगळं सुरु असताना सई घाबरते.
वाचा: डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात 'हे' हिंदी चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

आदित्यचे कान भरले सावनीने

आदित्य हे सगळं बघून चिडतो. त्याला सतत मुक्ता जे काही बोलली ते आठवत असते. त्याला सारखे वाटते की मुक्तामुळेच सावनी हर्षवर्धनशी लग्न करत आहे. तो सगळ्याला मुक्ताला दोषी मानत असतो. त्यात सावनी त्याला सतत हे सगळं मुक्तामुळे झाले आहे असे सांगत असते.
वाचा: १२ वर्षांचं प्रेम आणि वाचवायला फक्त ५ तास, 'विषय हार्ड'चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

सागर मुक्ताने काढली सईची समजूत

सावनीच्या वागण्यामुळे सईला त्रास होतो. ती मुक्ता आणि सागरला विचारते 'सावनी मम्माला मी आवडत नाही म्हणून ती माझ्याशी अशी वागते ना.' त्यावर मुक्ता तिला समजावते. त्यानंतर मुक्ता आणि सागर मेहंदीचा कोन घेऊन सईच्या हातावर मेहंदी काढायला जातात. पण सई त्या दोघांना एकमेकांच्या हातावर काढायला लावतात.

Whats_app_banner