'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता ही कोळी कुटुंबाला सांभाळताना दिसते. ती सई पासून इंद्रा पर्यंत सगळ्यांसाठी सर्वकाही करताना दिसत आहे. ती सगळ्यांची योग्य ती काळजी घेताना दिसते. आता त्यांच्या घरात सावनी आणि आदित्य राहायला आले आहेत. सावनी मुक्ताला सतत त्रास देताना दिसते. ती आदित्यच्या मनात देखील कोळी कुटुंबीयांविषयी वाईट गोष्टी भरवताना दिसते. मुक्ताला सावनीचे वागणे कळले आहे. त्यामुळे मुक्ता वेळोवेळी आदित्यला खरे दाखवून देण्याचा प्रयत्न करते. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया...
'प्रेमाची गोष्ट' मालिकेची सुरुवात ही आदित्यच्या प्रोजेक्ट पासून होते. सकाळी उठल्यावर आदित्यचा प्रोजेक्ट बिघडलेला असतो. तो पाहून आदित्य खचून जातो. त्यावर मुक्ता शक्कल लढवते आणि त्याला तो प्रोजेक्ट १५ मिनिटात कसा करता येईल हे सांगते. कुटुंबातील सर्वजण आदित्यला प्रोजेक्ट करण्यास मदत करतात. आदित्य देखील आनंदाने तो प्रोजेक्ट घेऊन शाळेत जातो. जाताना तो मुक्ताकडे डब्बा मागतो. ते पाहून मुक्ता आनंद होता.
मुक्ताचे आदित्यसोबतचे वागणे पाहून सावनीचा जळफळाट होतो. ती मुक्ताला हे नाटक थांबवायला सांगते. त्यावर स्वाती आणि कोमल सावनीला चांगलेच सुनावतात. त्यानंतर सावनी रागाच्या भरात कोण आहे ही मुक्ता जिचे तुम्ही इतके गुणगाण गाता असे म्हणते. त्यावर इंद्रा, स्वाती आणि कोमल सावनीला चांगलेच उत्तर देतात. त्या मुक्ताच्या पाठीमागे उभ्या राहतात आणि मुक्ता सर्वांसाठी काय काय करते हे सागंतात. रागात सावनी तेथून निघून जाते.
सकाळी मुक्ताने मदत केल्यामुळे आदित्यचा प्रोजेक्ट पूर्ण होतो. तो प्रोजेक्ट घेऊन आदित्य शाळेत जातो. त्याला आणि सईला या प्रोजेक्टसाठी बक्षीस मिळते. घरी आल्यावर सर्वजण आनंद व्यक्त करतात. सई तिला मिळालेले बक्षीस मुक्ताला देते. ते पाहून सावनीला वाटते की आदित्य हे बक्षीस तिला देईल. पण तो ही मुक्ताला देतो आणि तिचे आभार मानतो.
वाचा: अरबाजच्या जागी सूरज असता तर निक्कीला काय म्हणाला असता? 'माझ्या बच्चा' पाहा मजेशीर व्हिडीओ
सागर मुक्ताला सरप्राइज देण्यासाठी एक साडी आणि चिठ्ठी लिहून बेडवर ठेवतो. मुक्ता फ्रेश व्हायला जाते तेवढ्याच सावनी ती साडी चोरते. तयार होऊन सावनी मुक्ता ऐवजी गच्चीवर जाते. लाईट बंद असल्यामुळे सागरला सावनी आहे की मुक्ता हे कळत नाही. लाईट सुरु करताच मुक्ता तेथे पोहोचते. ती सावनीच्या कानशिलात लगावते. तसेच 'माझा नवरा चोरायचा देखील प्रयत्न करायचा नाही. लायकिचत राहायचं. जिथून घेऊन आले ना तुला तिथेच पुन्हा नेऊन टाकेन कचऱ्याच्या डब्ब्यात' असे मुक्ता बोलते.