Premachi Goshta:सावनीचा डाव ठरला अपयशी, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta:सावनीचा डाव ठरला अपयशी, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Premachi Goshta:सावनीचा डाव ठरला अपयशी, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 09, 2024 01:59 PM IST

Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेत सावनीने आखलेला डाव अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

premachi goshta
premachi goshta

'प्रेमाची गोष्ट' मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील मुक्ता, सागर, इंद्रा, स्वाती, लकी, माधवी, मिहिका, सावनी, आदित्य, सई प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. मालिकेत सर्व काही सुरळीत होत असतान लकीने गोंधळ घातला. आरतीच्या पोटात वाढत असलेले बाळ हे लकीचे आहे हे कळाल्यावर सर्वांना धक्काच बसला. सावनी या संधीचा फायदा घेते. ती आरतीला भडकवते आणि लकी विरोधात तक्रार करायला भाग पाडते. पण आता सावनीचा डाव अपयशी ठरला आहे. त्यामुळे आजच्या भागात काय होणार? चला जाणून घेऊया...

प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मुक्ता सागरसाठी नाश्ता करत असताना होता. पण सागरला मुक्ताच्या हातचे काहीच खायचे नाही. तो रागात तेथून उठून निघून जातो. त्यानंतर मुक्ता विचार करते की सागरला नेमकं काय झालं आहे? त्यानंतर मुक्ता सागरच्या मागे बेडरुममध्ये जाते. ती सागरच्या गाडीची चावी लपून ठेवते. सागर ती चावी शोधत असतो. पण त्याला सापडत नाही. त्याच्या मनात मुक्ताविषयी राग तसाच असतो. मुक्ता सागरला कसं बसं हसायला भाग पाडते. पण नंतर आशयचा फोन येतो आणि सागरला आणखी राग येतो.

मुक्ता गेली आरतीला भेटायला

आरती प्रेग्नंट असल्यामुळे मुक्ता तिला भेटायला गेली आहे. त्याच वेळी नेमकी आरतीच्या आईची तब्बेत बिघते. डॉक्टर आरतीच्या आईवर उपचार करायला नकार देतात. आरतीला अक्षरश: रडू कोसळते. तेवढ्यात मुक्ता येते आणि डॉक्टरांना फोन करते. डॉक्टर येऊन उपचार करुन जातात. त्यानंतर मुक्ता आरतीला लकी लग्नाला तयार झाल्याचे सांगते. तेही मनापासून लग्न करणार असल्याचे सांगते. त्यामुळे आरती देखील लग्नाला तयार होते.
वाचा: सख्ख्या आईला धान्य द्यायला निळू फुले यांनी दिला होता नकार? काय होते कारण वाचा

सावनीचा डाव फसला

आरती वकीलांना फोन करुन केस मागे घते. सावनी कोळी कुटुंबाच्या घरी पोलीस कसे पोहोचले नाहीत याचा विचार करत असते. सावनी आरतीला फोन करते. तेव्हा आरती तिला घडलेला प्रकार सांगते. तसेच सावनी लगेच तिला तू लग्नाला होकार दिला नाहीस ना असा प्रश्न विचारते. त्यावर आरती म्हणते मी आतापर्यंत जे वागले ते फार चुकीचे होते. मला ही केस करायची नाही. त्यानंतर आरती थेट फोन ठेवून देते. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Whats_app_banner