Premachi Goshta: आदित्यचे सत्य कळताच सागरने उचलला हात, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: आदित्यचे सत्य कळताच सागरने उचलला हात, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज घडणार?

Premachi Goshta: आदित्यचे सत्य कळताच सागरने उचलला हात, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 09, 2024 10:46 AM IST

Premachi Goshta Serial Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या मुक्ता काठीण काळातून जात आहे. पण तिच्या पाठीशी सागर असल्यामुळे तिला बरे वाटत आहे.

Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज घडणार?
Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज घडणार?

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. तिचा स्वभाव, तिचे वागणे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेत मुक्ता ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली आहे. मुक्ता एक डेंटिस्ट आहे. तिने सईसाठी सागर कोळीशी लग्न केले आहे. पण आता सागर आणि मुक्तामध्ये जवळीक निर्माण झाली आहे. पण सागरची पूर्वपत्नी सावनी ही सतत त्यांच्या संसारात डोके घालत असते.

मुक्ता पोहोचली चुकीच्या पत्त्यावर

सावनी आणि हर्षवर्धनचे लग्न होणार आहे. पण हर्षवर्धनला मात्र हे लग्न करायचे नाही. तो सतत हे लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण तरीही लग्नाआधीचे सर्व कार्यक्रम मात्र तो करत आहे. या सगळ्यात त्याला मुक्ताने केलेल्या अपमानाचा देखील बदला घ्यायचा असतो. हर्षवर्धन त्यासाठी एक डाव आखतो. तो आदित्यचा वापर करुन घेतो. हर्षवर्धन त्याची बॅचलर पार्टी आयोजित करतो. मुक्ताला सावनी तिच्या बॅचलर पार्टीचे आमंत्रण देते. पण आदित्य मुक्ताला सावनी ऐवजी हर्षवर्धनच्या पार्टीचा पत्ता पाठवतो. त्यामुळे मुक्ता चुकीच्या पत्त्यावर पोहोचली आहे.
वाचा: “रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात", अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट

मुक्तावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

हर्षवर्धनच्या पार्टीत सर्व पुरुष उपस्थित असतात. तेवढ्यात मुक्ता तेथे पोहोचते. तिला पाहून सर्वजण चकीत होतात. सर्वजण मुक्ताचा जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. मुक्ता सर्वांना लांब करते. ती सागरला पटकन फोन लावते. ते ऐकून सागर पळत तेथे पोहोचतो आणि मुक्ताला या सगळ्यामधून बाहेर काढतो. मुक्ताच्या मनावर या सगळ्याचा परिणाम होतो.
वाचा: श्रेया मोठा गेम झाला यार; ‘पुन्हा दुनियादारी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सागरने उचलला आदित्यवर हात

सावनीने असे करायला नको होते असे सतत सागरला वाटत असते. तो सावनीला जाब विचारण्यासाठी जातो. सावनी आणि सागरचे बोलणे सुरु असते. सावनी मी असे काहीही केलेले नाही सांगते. पण सागरचा तिच्यावर विश्वास बसत नाही. शेवटी सावनीला आठवते की तिच्या फोनचा पासवर्ड हा आदित्यकडे देखील आहे. तो आदित्यला देखील तेथे बोलावतो. तेव्हा आदित्य त्याच्यावर चिडतो आणि यांना आपली कोणाचीही काहीच पडलेली नाही असे बोलतो. त्यावर सागरला राग अनावर होतो आणि तो आदित्यवर हात उगारतो.
वाचा: जुई गडकरी हिला लग्नाच्या पंगतीतून उठवलं होतं; नेमकं काय घडलं होतं? वाचा!

Whats_app_banner