
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'प्रेमाची गोष्ट' पाहिली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून लकीने घातलेल्या गोंधळामुळे मुक्ता आणि सागरला त्रास आहे. लकी सख्खा दिर असताना देखील मुक्ता आरतीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया...
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सागरच्या रागापासून होते. आशय आणि मुक्ताला सोन्याच्या दुकानात एकत्र पाहून सागरला जळफळाट झाला आहे. पण सागर मुक्ताला काही बोललेला नाही. मुक्ताला सागर का चिडला आहे हे कळत नाहीये. सगळे जेवायला बसले असताना सागर येते आणि जेवायला नको असे म्हणतो. मुक्ता जबरदस्ती त्याला जेवायला वाढायला घेते. त्यापूर्वी ती कढी गरम करुन घेत असते. कढी गरम करताना तिला आशयचा फोन येतो. तो फोन ऐकून सागर आणखी चिडतो. मुक्ता एकदा आशयचा फोन ठेवते. त्यानंतर पुन्हा आशयचा फोन येतो. ते पाहून सागरला राग अनावर होतो. तो थेट उठून तेथून निघून जातो.
आरतीने लकी विरोधात तक्रार करावी म्हणून सावनी सतत कान भरताना दिसते. सावनी आरतीला मुक्ताविरोधात भडकवताना दिसते. आरती देखील स्वत:चे डोके वापरायचे सोडून सावनीचे सगळे ऐकताना दिसत आहे. आशयला आरतीने महागडा वकील केल्याचे कळते. तो मुक्ताला याबाबत सांगतो. तसेच आरतीसोबत कोणी तरी आहे असे देखील सांगतो. पण मुक्ता या सगळ्याकडे दुर्लक्ष करते. आरतीने का वकील करु नये असे ती म्हणते.
वाचा: पहिल्या पत्नीला दागिन्यांसह दिला अग्नी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीविषयी माहिती आहे का?
मुक्ताला पुन्हा असे वाटते की लकीशी एकदा बोलावे. ती लकीच्या खोलीत जाते आणि त्याच्याशी बोलते. ती लकीला पहिले कोमलचे उदाहरण देते. त्यानंतर लकीला त्याची चूक कळते. तो आरतीची माफी मागायला तयार होतो. तो आरतीशी लग्न करायला तयार होतो. ते ऐकून मुक्ताला आनंद होतो. आता मालिकेत पुढे काय होणार? सावनी सागरच्या मनात मुक्ताविषयी विष पेरणार का? आऱती केस मागे घेणार का? लकी आणि आरतीचे लग्न होणार का? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या
