मिहिरने सावनीसाठी हर्षवर्धनकडे घातली लग्नाची मागणी, काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मिहिरने सावनीसाठी हर्षवर्धनकडे घातली लग्नाची मागणी, काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत?

मिहिरने सावनीसाठी हर्षवर्धनकडे घातली लग्नाची मागणी, काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 08, 2024 11:03 AM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. मिहिरने थेट बहिणी सावनीचा हर्षवर्धनकडे हात मागितला आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय होणार?

Premachi Goshta: काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत
Premachi Goshta: काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत

'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत यावेळी सध्या वेगळी घडताना दिसत आहे. सतत सागर आणि मुक्ताला वेगळे करण्यासाठी कटकारस्थाने रचणाऱ्या सावनीला पहिल्यांदाच मिहिरने पाठिंबा दिला आहे. त्याने सावनीच्या लग्नासाठी हर्षवर्धनकडे हात मागितली आहे. आता मालिकेत आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया...

मिहिरने सावनी चांगलेच सुनावले

सागरवर खोटे आरोप लावून त्याला जेलमध्ये टाकण्याचा सावनीचा डाव यशस्वी ठरला होता. पण मिहिरने सगळे आरोप स्वत:वर घेत सावनीच्या डावावर पाणी फिरवले. पण मुक्ताने सत्य समोर आणत मिहिरलाही तुरुंगातून बाहेर काढले. त्यानंतर सावनी मिहिरला भेटण्यासाठी कोळी कुटुंबीयांकेड जाते. पण सावनी पाहूनच मिहिरचा मनस्थाप होतो. तो सावनीला तेथून निघून जाण्यास सांगतो. तसेच माझी एकच बहिण आहे मुक्ता सागर कोळी त्यामुळे तू इथून निघून जा असे देखील मिहिर बोलतो.
वाचा: अमिताभ हे रेखासोबत काम करु शकतात का? जया बच्चन यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

सावनीचा खरा होतू

हर्षवर्धन सावनीसमोर एक अटक ठेवतो जर तुझा भाऊ मिहिर तुझी मागणी घेऊन आला तरच मी तुझ्याशी लग्न करेन. त्यासाठी सावनी कोळी कुटुंबीयांकडे जाते. गेल्यावर असे दाखवते की तिला मिहिरची खूप काळजी आहे. पण तिचा खरा हेतू फार वेगळा असतो. मिहिरने हर्षवर्धनकडे तिचा द्यावा असे तिला वाटत असते. पण मिहिर या सगळ्या गोष्टी करण्यास नकार देतो. सावनीला राग अनावर होतो आणि ती तेथून निघून जाते.
वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री, चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

मुक्ताने मिहिरला समजावले

मुक्ता मिहिरची समजूत काढते. ती मिहिरला स्वातीचे उदाहरण देते. जरी तिने कितीही चुका केल्या तरी सागर तिला माफ करणार. तसेच तू ही करायला हवे असे मुक्ता बोलते. त्यानंतर मुक्ता आणि मिहिर हर्षवर्धनच्या घरी जातात. तेथे गेल्यावर हर्षवर्धन आणि त्याचा मित्र लग्न होणार नसल्याचा आनंद साजरा करत असतात. दरम्यान, हर्षवर्धन मित्राला सावनीशी लग्न करण्याची इच्छा नसल्याचे सांगतो. ती कसेबसे करुन लग्नाला तर होकार देतो. पण सावनीला काही दिवस मिहिरकडे जाऊन राहण्यास सांगतो. एकदा सावनी तेथून निघून गेली की पुन्हा तिच्याशी काही संबंध नाही उरणार असे हर्षवर्धन म्हणतो. आता येत्या भागात सावनीसमोर हर्षवर्धनचा खरा चेहरा येणार का? त्यांचे लग्न होणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.
वाचा: कलाला कळाली आई-वडिलांची बिकट परिस्थिती, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

Whats_app_banner