Premachi Goshta: मुक्ताने सावनीच्या लगावली कानशि‍लात, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नेमकं काय घडलं?-star pravah premachi goshta serial 7th september 2024 update ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: मुक्ताने सावनीच्या लगावली कानशि‍लात, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नेमकं काय घडलं?

Premachi Goshta: मुक्ताने सावनीच्या लगावली कानशि‍लात, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नेमकं काय घडलं?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 07, 2024 11:54 AM IST

Premachi Goshta Update: छोट्या पडद्यावरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्या सर्वांची मने जिंकत आहे. आता मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे. चला जाणून घेऊया मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

premachi goshta
premachi goshta

छोट्या पडद्यावरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील मुक्ता, सागर, इंद्रा, स्वाती, लकी, माधवी, मिहिका, सावनी, आदित्य, सई प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. सागर आणि मुक्तामध्ये चांगली जवळीक निर्माण झाली आहे. त्यांचे नाते योग्य वळणावर आले आहेत. पण सावनीला हे पाहावत नाही. ती सतत त्या दोघांच्या नात्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

मुक्ताने सई आणि आदित्यचा केला प्रोजेक्ट

प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ता ही सागरला आदित्य आणि सईचे वडील असल्याचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच मुलांच्या मनात देखील आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मुक्ता हवे ते करायला तयार आहे. मुक्ता आदित्य आणि सईच्या शाळेत दिलेला प्रोजेक्ट करायला बसते. ती सागर आणि दोन्ही मुले मिळून प्रोजेक्ट करतात. ते पाहून सावनीचा जळफळाट होतो. सावनी आदित्यने कलेला प्रोजेक्ट बदलते. आदित्यही नकार देतो पण ऐकेल ती सावनी कसली.

लकी फसवतोय आरतीला

लकी हा नेहमीच मुलींना फसवत आला आहे. आधी त्याने मिहिकाला फसवण्याचा प्रयत्न केला. आता तो मुक्ताच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या आरतीला फसवत आहे. त्याने आरतीला लग्नाचे वचन दिले आहे. आरती सतत त्याला आपण आपल्या नात्याविषयी घरी सांगूया असे म्हणत असते. पण लकीला ते मान्य नाही. उलट हे नाते सर्वांपासून लपवता यावे म्हणून तो आरतीला एक नवे सीम घेऊन देतो. तो तिला या नव्या सीमवरुन फोन करायला सांगतो.
वाचा: २ शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून शोसाठी आलेल्या सूरज चव्हाणकडे डिझायनर कपडे कसे?

सागरने मुक्तासाठी केला सरप्राईज प्लान

मुक्ता आणि सागरचे नाते गेल्या काही दिवसांपासून योग्य वळवणार पोहोचले आहे. दोघेही एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात. सागर मुक्ताचे आभार मानतो. ती नसती तर कदाचित सागर एक चांगला वडील झाला नसता असे तो म्हणतो. त्यानंतर सागर मुक्ताला सरप्राइज देण्यासाठी एक साडी आणि चिठ्ठी लिहून बेडवर ठेवतो. मुक्ता फ्रेश व्हायला जाते तेवढ्याच सावनी ती साडी चोरते. तयार होऊन सावनी मुक्ता ऐवजी गच्चीवर जाते. लाईट बंद असल्यामुळे सागरला सावनी आहे की मुक्ता हे कळत नाही. लाईट सुरु करताच मुक्ता तेथे पोहोचते. ती सावनीच्या कानशि‍लात लगावते. तसेच 'माझा नवरा चोरायचा देखील प्रयत्न करायचा नाही. लायकिचत राहायचं. जिथून घेऊन आले ना तुला तिथेच पुन्हा नेऊन टाकेन कचऱ्याच्या डब्ब्यात' असे मुक्ता बोलते.

Whats_app_banner