'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. तिचा स्वभाव, तिचे वागणे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेत मुक्ता ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली आहे. मुक्ता एक डेंटिस्ट आहे. तिने सईसाठी सागर कोळीशी लग्न केले आहे. पण हळूहळू सागर आणि मुक्ता हे जवळ येताना दिसत होते. आशातच मुक्ताचा मित्र आशयची मालिकेत एण्ट्री झाली आहे. त्याच्या येण्याने सर्व काही बदलले आहे. चला जाणून घेऊया मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही कोळी कुटुंबीय एकत्र येऊन सागला मिळणाऱ्या पुरस्काराचा आनंद व्यक्त करण्यापासून होते. सागरने स्वत:हून घरात त्याला मिळणाऱ्या पुरस्काराविषयी सांगितलेले नाही. पण आशय मुक्ताला सागरला मिळत असलेल्या पुरस्काराविषयी सांगतो. त्यानंतर मुक्ता घरातील सर्वांना सांगते. आता सर्वजण आनंद व्यक्त करतात. पण सागरला आशयचा राग येतो. कारण त्याला स्वत:ला मुक्ताला हे सांगयचे असते.
या वर्षीचा बेस्ट बिझनेस मॅन ऑफ इअर हा पुरस्कार सागरला मिळणार असल्याचे हर्षवर्धनला कळताच त्याचा जळफळाट होतो. मिहिका या आगीत आणखी तेल घालते. पण नंतर हर्षवर्धनला कळते की आशय हा मुक्ताचा मित्र आहे. म्हणून सागरला हा पुरस्कार देण्यात आला आहे. हर्षवर्धन मुद्दाम सावनीला फोन करतो. तो सावनीला सुरु असलेल्या चर्चेविषयी सांगतो. सावनी तर सागरचे कान भरण्यासाठी निमित्त शोधत असते. त्यामुळे ती योग्य संधीची वाट पाहात असते.
वाचा: बॉलिवूडमध्ये १९८०साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमामुळे झाले होते रेल्वेचे नुकसान, चित्रपटही ठरला फ्लॉप
सागरला इतका मोठा पुरस्कार मिळत असल्यामुळे मुक्ता आनंदी झाले असते. ती सागरला काही तरी गिफ्ट द्यायचा विचार करते. त्यासाठी आशयला फोन करुन बोलावते. दोघेही सोन्याच्या दुकानात जातात. आशय आणि मुक्ता भेटणार असल्याचे सावनीला कळते. ती सागरला घेऊन तेथे पोहोचते. तसेच सागरचे कान भरते तुझ्या नशीबात बायको लिहिलेली नाही. हीपण तुला सोडून जाणार. तसेच तुला मुक्तामुळे बेस्ट बिझनेस मॅनचा अवॉर्ड मिळत आहे. ते ऐकून सागरला राग अनावर होतो. तो तेथून निघून जातो. आता मालिकेच्या आगामी भागात सागर मुक्ताशी कसा वागणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.