'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता ही कोळी कुटुंबाला सांभाळताना दिसते. ती सई पासून इंद्रा पर्यंत सगळ्यांसाठी सर्वकाही करताना दिसत आहे. ती सगळ्यांची योग्य ती काळजी घेताना दिसते. आता त्यांच्या घरात सावनी आणि आदित्य राहायला आले आहेत. सावनी मुक्ताला सतत त्रास देताना दिसते. चला जाणून घेऊया 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घेणार...
आदित्य घरी आल्यापासून कोळी कुटुंबीय आनंदी आहेत. सर्वजण एकत्र जेवताना दिसत आहेत. आदित्यला सागर, इंद्रा, सई, स्वाती, लकी सर्वचजण घास भरवताना दिसतात. मुक्ता सर्व कोळी कुटुंबीय आनंदी असल्यामुळे आनंदी होते. हे सगळं पासून सावनीला प्रचंड राग येतो. ती आदित्यवर चिडते.
जेवण झाल्यानंतर सावनी आदित्यला खोलीमध्ये बोलावते. ती आदित्यला विचारते तू या सगळ्यांसोबत का जेवत होतास? तुला हाताने जेवता येत नाही का? सगळ्यांनी तुला कशाला भरवायला हवे? जर तुझ्याकडून चूक झाली तर मुक्ता लगेच आपल्याला घराबाहेर काढेल. त्यामुळे तुला जे काही करायचे ते जरा जपून कर. सर्वांपासून थोडा लांब रहा. तेवढ्यात सई तेथे येते आणि आदित्यला झोपण्यासाठी तिच्या खोलीत घेऊन जाते. आदित्य देखील आनंदाने तिच्या खोलीत जाऊन झोपलो
मुक्ताला रात्री तहान लागते. ती पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जाते. तेवढ्यात तिला घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसते. ती सगळ्यांच्या खोलीत जाते आणि आदित्य आहे का पाहाते. आदित्य तिला घरात कुठेही दिसत नाही. मुक्ता घाबरते. ती आदित्यला शोधण्यासाठी जाते. तेव्हा आदित्य बिल्डींग खाली बसलेला असतो. तो एकाच काही तरी बोलत असतो. मुक्ता जाते त्याच्या शेजारी बसते. आदित्य मुक्ताकडे हात जोडून आम्हाला घरा बाहेर काढू नकोस, आमच्याकडे घर नाही अशी विनवणी करतो. मुक्ताला ते पाहून फार वाईट वाटते.
वाचा: राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया विभक्त झाल्यानंतर जमिनीवर झोपून रडत होती ट्विंकल खन्ना
मुक्ता आदित्यला घेऊन घरी येते. ती त्याला सागरसोबत झोपण्यास सांगते. सागर देखील त्याला कुशीत घेऊन झोपतो. नेमकं काय झाले असा प्रश्न सागरला पडतो. मुक्ताल यावर आपण सकाळी बोलू असे म्हणते. आदित्य रात्री झोपेत सू करतो. मुक्ताचा बेड पूर्ण ओला होता. सकाळी ते पाहाते. तिला प्रश्न पडतो. पण सावनी आदित्यला घाबरवते की मुक्ता आपल्याला घराबाहेर काढेल. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार जाणून घेऊया…