मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मिहिका आणि मिहिरचा होणार साखरपुडा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीने आखला नवा डाव

मिहिका आणि मिहिरचा होणार साखरपुडा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीने आखला नवा डाव

Aarti Vilas Borade HT Marathi
May 06, 2024 12:04 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण आले आहे. मिहिका आणि मिहिरचा साखरपुडा होणार आहे. पण यावेळी सावनीने नवा डाव आखला आहे. आता तिचा डाव काय आहे चला पाहूया...

मिहिका आणि मिहिरचा होणार साखरपुडा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीने आखला नवा डाव
मिहिका आणि मिहिरचा होणार साखरपुडा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीने आखला नवा डाव

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. सागर आणि मुक्ता यांच्या नात्यात प्रेम खुलत आहे. तर स्वाती कार्तिकसोबत घडलेल्या गोष्टींचा सूड घेण्यासाठी बसली आहे. ती सतत काही तरी नवा डाव आखताना दिसत आहे. तसेच या सगळ्यात सावनी देखील कमी नाही. ती देखील मध्ये मध्ये काही तरी करताना दिसत आहे. आता 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

सागर आणि मुक्ताने एकमेकांसाठी लिहिले पत्र

सागर आणि मुक्ता बिल्डींग खाली येऊन उभे असतात. दोघेही एकमेकांची वाट पाहात असतात. मुक्ताने भेटायला बोलावले म्हणून सागर खूश असतो. थोडा लाजत तो उभा असतो. तेवढ्यात मुक्ता येते आणि सागरला हे असणं बोलण बरं नाही असे सांगते. तेव्हा सागर तिला सांगतो मी तुम्हाला बोलवले नाही. तुम्हीच मला पत्र लिहिले आहे. तेव्हा मुक्ता तिच्या हातातले पत्र देखील दाखवते. ती सांगते मलाही तुमचे पत्र मिळाले. दोघे विचार करत असताना त्यांना मिहिका आणि मिहिर दिसतात.
वाचा: 'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

मिहिका आणि मिहिरने दिली प्रेमाची कबूली

सागर आणि मुक्ता हे बिल्डींग खाली असताना मिहिका व मिहिरला एकत्र गप्पा मारताना पाहातात. मिहिर मिहिकाला लग्नाची मागणी घालतो आणि ती देखील हो बोलते. त्या दोघांना पाहून ही पत्र त्यांची असल्याची जाणीव सागर-मुक्ताला होते. ते दोघांना पकडतात आणि कुटुंबीयांसमोर उभे करतात.
वाचा: ‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका

उद्या होणार मिहिका आणि मिहिरचा साखरपुडा

केळी आणि गोखले कुटुंबीयांना सागर-मुक्ता एकत्र बोलावतात. तसेच मिहिका आणि मिहिर चुकीचे करत असल्याचे सांगतात. ते ऐकून सर्वजण चकीत होतात. नेमकं काय झाले आहे ते त्यांना कळत नाही. शेवटी मिहिका प्रेमाची कबूली देते आणि लग्न करायची इच्छा व्यक्त करते. दोन्ही कुटुंबीय मिळून दोघांचा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतात. आता त्यांच्या साखरपुड्याची तयारी सुरु असते.
वाचा: 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या

सावनीने आखला नवा डाव

सावनीला मिहिका आणि मिहिरच्या साखरपुड्याविषयी कळते. तिला धक्का बसतो. ती हा साखरपुडा कसा होतो हेच बघते असे हर्षवर्धनला बोलते. त्यानंतर ती मिहिर आणि मिहिकाच्या साखरपुड्याला पोहोचते. गोखले कुटुंबीय तिला तेथून जाण्यास सांगतात. पण ती काही जायला तयार नाही. शेवटी सावनी सर्वांना सत्य सांगते. मिहिर हा सावनीचा भाऊ आहे. हे कळताच गोखले कुटुंबीयांना धक्का बसतो.

IPL_Entry_Point