मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  स्वातीने सांगितले सत्य, कार्तिक गेला तुरुंगात ! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

स्वातीने सांगितले सत्य, कार्तिक गेला तुरुंगात ! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 06, 2024 01:41 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागर हा तुरुंगात गेलेला असतो. पण त्याला सोडवण्यासाठी मिहिर सगळे आरोप स्वत:वर घेतो. तेवढ्यात स्वाती सगळं सत्य सांगते आणि कार्तिकला अटक होते.

premachi goshta: कार्तिक गेला तुरुंगात
premachi goshta: कार्तिक गेला तुरुंगात

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी आणि हर्षवर्धनला त्यांचा डाव यशस्वी झाला असे वाटत असते. ते या सगळ्याचा आनंद साजरा करत असतात. पण काही क्षणातच त्यांच्या आनंदावर विरझण पडते. तुरुंगात असलेल्या सागरला सोडवण्यासाठी मुक्ता प्रयत्न करत असते. तेवढ्यात मिहिर सगळे आरोप स्वत:वर घेतो आणि जेलमध्ये जातो. आता मालिकेत आजच्या भागात काय घडले चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

सागरच्या स्वागताची जंगी तयारी

मुक्ता सागरला कसे सोडवायचे असा विचार करत असतानाच तिला वकीलांचा फोन येतो आणि तो तुरुंगातून सुटला असल्याचे कळते. मुक्ता इंद्रा, लकी, सई आणि घरातील सर्वांनाच ही आनंदाची बातमी देते. इंद्रा सागरच्या आवडची जेवण बनवते, लकी आणि सई घराचे डेकोरेशन करतात. सागरच्या स्वागताची सर्वजण जंगी तयारी करतात. तेवढ्यात सागर येतो. पण सागर फारसा आनंदी नसल्याचे मुक्ताला जाणवते. तेव्हा सागर सांगतो की मिहिरने सगळे आरोप स्वत:वर घेतले आहेत. त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मुक्ता आणि सागर जीवाचे रान करतात.
वाचा: "दोन मनाच्या दोन दिशा अन एक हळवी वाट...", ‘अंतरपाट’ मालिकेचे शीर्षकगीत ऐकलेत का?

मुक्ता पोहोचली सावनीच्या घरी

मिहिर तुरुंगात आहे हे पाहून मुक्ता सावनीच्या घरी जाते. तिला, 'तूला आता एकच प्रश्न पडला असेल की सागर तुरुंगातून बाहेर कसा आला. तुला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची किंवा लोकांची काळजीच नसते. आमच्या मिहिरला आम्ही तुरुंगातून बाहेर काढू. त्याची वहिनी आणि सख्या भाऊ जीवंत आहेत' असे बोलून सुनावते. ते ऐकून सावनीला देखील धक्का बसतो. आता मिहिरला कसे सोडवायचे असा प्रश्न तिला पडतो. ती हर्षवर्धनला सांगते. पण तो काही ऐकायला तयार नसतो. मला जे हवे होते ते मिळाले आहे. सागरला चांगली शिक्षा झाली आहे. मला हवी असलेली डिल देखील मिळाली आहे. त्यामुळे आता मला काही फरक पडत नाही. तसेच मिहिर तुझा भाऊ असला तरी तो सागरचे सगळे ऐकतो असे म्हणतो. त्यानंतरही सावनी मी माझ्या भावाला तुरुंगातून बाहेर काढेन असे बोलते.
वाचा: 'दुनियादारी २' येणार? अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरच्या नव्या चित्रपटाची घोषणा

स्वातीने सांगितले सत्य

मुक्ता स्वाताली शोधून काढते. त्यानंतर ती स्वातीला घेऊन पोलीस ठाण्यात जाते. ती बॅग आणि त्यामधील सगळे पैसे व सोने हे कार्तिकचे असल्याचे स्वाती सांगते. त्यानंतर पोलीस तातड्याने कार्तिकला अटक करतात. आता मालिकेत पुढे काय होणार? सागर स्वातीला माफ करणार का? स्वातीच्या मनात मुक्ताविषयी प्रेम निर्माण होणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. येत्या काळात प्रेक्षकांना त्यांच्या या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.
वाचा: नैनाचे सत्य कला आणणार का सर्वांसमोर? 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार?

टी-२० वर्ल्डकप २०२४