'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता ही कोळी कुटुंबाला सांभाळताना दिसते. ती सई पासून इंद्रा पर्यंत सगळ्यांसाठी सर्वकाही करताना दिसत आहे. ती सगळ्यांची योग्य ती काळजी घेताना दिसते. आता त्यांच्या घरात सावनी आणि आदित्य राहायला आले आहेत. सावनी मुक्ताला सतत त्रास देताना दिसते. ती आदित्यच्या मनात देखील कोळी कुटुंबीयांविषयी वाईट गोष्टी भरवताना दिसते. मुक्ताला सावनीचे वागणे कळले आहे. तसेच आदित्य ज्या परिस्थितून जात आहे त्याला सावनी जबाबदार असल्याचेही ती सांगते. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया...
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता दररोज सावनीला आदित्यचा टिफिन बनवायला सांगते. पण सावनी एक नंबरची कामचोर असते. ती आदल्याच दिवशी आदित्यसाठी पराठे ऑर्डर करते आणि दुसऱ्या दिवशी डब्ब्यात गरम करुन देते. पण दुसऱ्या दिवशी खाई पर्यंत ते पराठे खराब होतात. ते पाहून सई आदित्यला तिचा डब्बा देते खायला. सुरुवातीला आदित्य नकार देतो. पण नंतर त्याला ते पराठे आवडतात. घरी आल्यावर आदित्य मुक्ताने बनवलेल्या पराठ्यांचे कौतुक करतो.
आदित्यला कोळींचे घर आपले आहे असे वाटावे यासाठी मुक्ता प्रयत्न करत असते. त्यासाठी मुक्ता आदित्यचे कुटुंबीयांसोबतचे फोटो एका भींतीवर लावते. आदित्य घरी आल्यावर ते फोटो पाहून खूश होतो. सागर त्याला ही आयड्या मुक्ताची असल्याचे सांगतो. पण आदित्य मुक्ताचे आभार मानतो.
सावनीने पराठे विकत आणल्याचे कोमलला कळते. कोमल त्या पराठ्यांचे बिल मुक्ताला देते. तेव्हा मुक्ता सावनीला चांगलाच धडा शिकवण्याचे ठरवते. ती आदित्यसमोर सावनीला सगळ्या घरातल्यांचा स्वयंपाक करण्यास सांगते. जेणेकरुन तिला सवय होईल. आदित्य देखील सावनीला स्वयंपाक कर असा आग्रह करतो. आता सावनी याचा बदला कसा घेणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: वन नाईट स्टँडपासून सुरू झाली 'या' कपलची लव्हस्टोरी, अभिनेत्रीने केले आहे शाहरुखसोबत काम
मिहिकाचे प्रेग्नंसी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन प्रचंड चिडला आहे. मिहिका त्याला म्हणते, 'अभिनंद हर्षवर्धन.. तू पुन्हा एकदा दुसऱ्या कोणाच्या तरी मुलाचा बाप होणार आहेस.' मिहिकाने तिच्या मैत्रिणीला सांगून हे खोटे रिपोर्ट्स घरी पाठवायला सांगते. आता हर्षवर्धन मालिकेत पुढे काय करणार हे पाहण्यासारखे आहे.