'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवा ट्विस्ट, सागरला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मिहिरने सगळे आरोप घेतले स्वत:वर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवा ट्विस्ट, सागरला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मिहिरने सगळे आरोप घेतले स्वत:वर

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवा ट्विस्ट, सागरला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मिहिरने सगळे आरोप घेतले स्वत:वर

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jun 05, 2024 01:10 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत खूप काही घडताना दिसत आहे. आता मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. सागरचे सगळे आरोप मिहिरने त्याच्यावर घेतले आहेत. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय घडणार..

premachi goshta: मिहिरने सगळे आरोप घेतले स्वत:वर
premachi goshta: मिहिरने सगळे आरोप घेतले स्वत:वर

'प्रेमाची गोष्ट' ही झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने टीआरपी यादीमध्ये स्थान पटकावले आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. सावनीने सागरला तुरुंगात टाकले आहे. या सगळ्याचा आनंद साजरा करत असतानाच मिहिरने सगळे आरोप स्वत:वर घेत तुरुंगात जाण्याचे ठरवले. आता सावनी पुढे काय करणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

कार्तिकने केले स्वातीला किडनॅप

मुक्ता सावनीच्या घरी जाते. तेव्हा तिला हे सगळं कार्तिकने स्वातीकडून करुन घेतल्याचे कळते. ती या घटनेचा व्हिडीओ करुन स्वातीला दाखवते. स्वातीला विश्वास बसत नाही. शेवटी फोन करुन कार्तिकला जाब विचारते. त्यानंतर स्वाती आणि मुक्ता पोलीस स्टेशनला जात असतात. कार्तिक आणि सावनी विरोधात तक्रार करायला. याविषयी कार्तिकला कळते आणि तो स्वातीला किडनॅप करतो. आता मुक्ता सागरला सोडवणार का? स्वातीचा पत्ता सापडेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. येत्या काळात त्यांना या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.
वाचा: अभिनेत्री अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडेचे झाले अपहरण? काय आहे प्रकरण जाणून घ्या

मिहिरने घेतले स्वत:वर आरोप

सागर सावनीमुळे तुरुंगात असल्यामुळे मिहिरच्या मनात सतत गिल्ट येतोय. सगळ्यांना अडचणीत पाहून तो पोलीस ठाण्यात जातो. या प्रकरणात सागर कोळीची काहीच चुक नाही असे पोलिसांना सांगतो. त्यामुळे पोलीस सागरला सोडतात आणि मिहिरला जेलमध्ये टाकतात. सागरला देखील हे पाहून धक्का बसतो.
वाचा: अभिनेते अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणून आवाज का देतात? जाणून घ्या

मुक्ताने घेतली सावनीची भेट

मुक्ता सावनीला भेटण्यासाठी जाते. ती जे काही करत आहे ते चुकीचे आहे असे ती सांगते. तसेच सागरला बाहेर काढण्यासाठी मिहिरने सगळे आरोप त्याच्यावर घेतले असल्याचे सांगते. हे ऐकून सावनीला धक्का बसतो. तसेच मुक्ता सावनीला आम्ही आमच्या माणसाला सोडवूच पण तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आणू असे देखील बोलते. त्यानंतर सागरला प्रश्न पडतो की आपण मिहिरला कसे तुरुंगातून बाहेर काढायचे. मुक्ता यावरही काही तरी मार्ग काढेल असा विश्वास सर्वांना आहे. आता मालिकेच्या आगामी भागात सावनी नेमकं कोणतं पाऊल उचलणार? या सगळ्यात कार्तिक अडकणार का? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.
वाचा: निकालापूर्वीच 'या' खानने केले पंतप्रधान मोदी आणि भाजपचं अभिनंदन, पोस्ट व्हायरल

Whats_app_banner