'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काही दिवसांपूर्वी सावनी आणि हर्षवर्धनचे लग्न मोडले. असे ही हर्षवर्धनला सावनीशी लग्न करण्याची जराही इच्छा नव्हती. त्यामुळे तो फक्त निमित्त शोधत होता. हर्षवर्धनने मिहिकाला मोहरा बनवून लग्न मोडले. त्याने मिहिकाला लग्न करण्यास भाग पाडले. पण लग्नानंतर हर्षवर्धनच्या सर्वकाही मनाविरुद्ध होताना दिसत आहे. मिहिका त्याचे काहीही ऐकत नाही. ती सतत हर्षवर्धनला त्रास देताना दिसते. आता मिहिका प्रग्नेंट असल्याचे समोर आले आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही संपूर्ण कोळी कुटुंबीय एकत्र आनंदाने खेळताना दिसत आहेत. सागर, सई, मुक्ता आणि आदित्य हे एकत्र कॅरम खेळत असतात. आदित्य कॅरम खेळताना जिंकतो. ते पाहून सावनीचा जळफळाट होतो. खोलीत असताना आदित्य येतो आणि सावनीसमोर आनंद व्यक्त करत असतो. पण सावनी त्याच्यावर चिडते. तेवढ्यात मुक्ता तेथे येते. ते पाहून सावनीचा सूर बदलतो. सावनी आदित्यशी प्रेमाने बोलते.
आदित्य सावनीला सईसाठी देखील डब्बा करायला सांगतो. पण सकाळी उठल्यावर कामचोर सावनी ऑनलाइन पराठे मागवते. तिने ते पराठे बनवले असल्याचे आदित्यसमोर सांगते. पण मुक्ताच्या मनात थोडा डाऊट येतो. त्यातही सावनी सईसाठी पराठे मागवायला विसते. ते पाहून तर मुक्ता आणखीच चिडते. आता सावनीने पराठे ऑर्डर केले होते हे जेव्हा मुक्ताला कळणार तेव्हा काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे..
वाचा: बॉलिवूडमधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा यूट्यूबवर प्रदर्शित! बजेट ४५ कोटी आणि कमाई ०.०१ कोटी
सागर आणि मुक्ता सतत एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. मालिकेत चुकून मुक्ताकडून सागरच्या अंगावर थंड पाणी फेकले जाते. सागर देखील मुक्ताला भिजवतो. पण मुक्ताला थंडी लागत असल्यामुळे सागर तिला अंगावर पांघरुण देतो. दरम्यान, दोघांमधील केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.
मिहिका आणि हर्षवर्धन यांच्यामध्ये सध्या जोरदार भांडणे सुरु आहेत. मिहिका सतत हर्षवर्धनचा अपमान करत असते. ती त्याला जराही जवळ येऊ देत नाही. त्यात मिहिकाचे प्रेग्नंसी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन प्रचंड चिडला आहे. मिहिका त्याला म्हणते, 'अभिनंद हर्षवर्धन.. तू पुन्हा एकदा दुसऱ्या कोणाच्या तरी मुलाचा बाप होणार आहेस.' ते ऐकून हर्षवर्धनचा जळफळाट होतो. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.