प्रेमाची गोष्ट मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. सावनी आणि हर्षवर्धनमुळे सागरच्या आयुष्यात मोठे वादळ आले आहे. आयकर विभागाने सागरच्या घरावर छापा टाकला. त्यामध्ये घरात पैसे आणि सोने सापडले. त्यामुळे सागरला जेलमध्ये जावे लागले. तर दुसरीकडे मुक्ताचे लायसन्स सावनीने रद्द केले. या सगळ्यात सागरच्या बिझनेसवर मोठा फटका बसत आहे. चला जाणून घेऊया 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार...
सावनी सागरला तुरुंगात भेटण्यासाठी येते. ती सागरशी डील करण्यासाठी तयार होतो. सावनी सागरला ५०० कोटीची डील ही हर्षवर्धनला द्यायला सांगते. त्याच्या बदल्यात ती मुक्ताचे सायसन्स परत देते. सागर या डीलसाठी पटकन तयार होतो. मुक्तासाठी अशा शंभर डील मी सोडून देईन असे सागर बोलतो. ते ऐकून सावनीला धक्का बसतो. पण ती मनोमन खूश होते.
वाचा: सहा अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी करतोय रोमॅन्स, नेमकी काय आहे भानगड जाणून घ्या ?
मुक्ता सागरला भेटण्यासाठी तुरुंगात जाते. ती सागरला विचारते कसे आहात? त्यानंतर ती सागरला वचन देते की ज्याने कुणी तुमच्यासोबत हे केले आहे त्याला मी शोधून काढेन आणि शिक्षा देईन. त्याच वेळी मुक्ता विचार करते की कसा शोध घ्यायचा. आता मुक्ता शोधून काढणार का सत्य? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
वाचा: मल्लिकाजान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नेटफ्लिक्सने केली 'हिरामंडी २'ची घोषणा
सागर तुरुंगात असल्यामुळे सावनी आणि हर्षवर्धन, कार्तिक हे सगळेजण सेलीब्रेशन करत आहेत. ते बघून आनंद व्यक्त करत असतात. तेव्हा हर्षवर्धन येतो आणि खिश्यातली अंगठी काढून सावनीला लग्नासाठी प्रपोज करतो. सावनी लग्नासाठी होकार देते. कार्तिक या सगळ्यात मला पैसे दे आता आणखी असे बोलतो.
वाचा: सलमान खानशी लग्न करायला फार्म हाऊसमध्ये शिरली २४ वर्षांची तरुणी! पुढं काय झालं पाहा!
मुक्ता सावनीच्या घरी जाते. तेव्हा तिला हे सगळं कार्तिकने स्वातीकडून करुन घेतल्याचे सांगते. त्यानंतर स्वाती आणि मुक्ता पोलीस स्टेशनला जात असतात. कार्तिक आणि सावनी विरोधात तक्रार करायला. याविषयी कार्तिकला कळते आणि तो स्वातीला किडनॅप करतो. आता मुक्ता सागरला सोडवणार का? स्वातीचा पत्ता सापडेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. येत्या काळात त्यांना या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.
संबंधित बातम्या