'प्रेमाची गोष्ट' मालिकेतस सागर कोळीची पूर्व पत्नी सावनी ही अखेर बॉयफ्रेंड हर्षवर्धनशी लग्न करणार आहे. हर्षवर्धनला हे लग्न जरी करायचे नसले तर सावनी त्याला सोडणार नाहीये. त्यामुळे त्याला नाईलाजाने लग्न करावे लागणार आहे. हर्षवर्धन तरीही अनेक कारणे सांगून टाळाटाळ करत आहे. पण याचा सावनीवर काही परिणाम होताना दिसत नाही. चला पाहूया आजच्या भागात काय होणार?
मुक्ता सकाळी उठल्यानंतर तिची रुम आवरते. नंतर कपडे धुवायला टाकायचे म्हणून ती सागरच्या शर्ट आणि पँटचे खिशे तपासते. तिला सागरच्या खिश्यात १२ लाख रुपयाची पावती सापडते. ती सागरला एवढ्या पैशाचं काय घेतलं असा प्रश्न विचारते. सागरकडे त्यावर द्यायला उत्तर नसते. त्याने खरतर मुक्तासाठी १२ लाख रुपयांची ज्वेलरी खरेदी केली आहे. पण सरप्राईज द्याचे म्हणून तो सावनीला गिफ्ट दिलं असं सांगतो.
वाचा: गेली ४० वर्षे रजनीकांतसोबत का काम केले नाही? कमल हासन यांनी सांगितले कारण
सावनीचा मेहंदी सोहळा पार पडला. या सोहळ्यात सावनीने पुन्हा ड्रामा केलाच. पण या मेहंदी सोहळ्याला आलेल्या पाहुण्यांनी सावनीसाठी गिफ्ट आणले होते. हे गिफ्ट घेऊन सावनी हर्षवर्धनच्या घरी जाते. तेथे ती त्याच्यासोबत बसून सगळे गिफ्ट उघडते. त्यामध्ये सागर कोळीने देखील दिलेले गिफ्ट असते. ते पाहून हर्षवर्धनला प्रश्न पडतो की त्याने सावनीला काय गिफ्ट दिले आहे. सावनी जेव्हा ते गिफ्ट उघडून पाहाते तेव्हा त्यामध्ये प्रेशर कुकर असतो. ते पाहून हर्षवर्धनला हसू अनावर होते.
वाचा: मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची पोस्ट, वेधले सर्वांचे लक्ष
सागरच्या खिश्यातील १२ लाखाचे गिफ्ट हे सावनीसाठी असल्याचे मुक्ताला कळताच तिलाही ते हवे असते. ती सागरवर चिडते. मग सागर सावनीला दिलेला प्रेशर कुकर मुक्तासाठीही मागवतो. गिफ्ट आल्यावर मुक्ता ते उघडून पाहाते तेव्हा तिलाही हसू अनावर होते. पण सागरने सावनीला प्रेशर कुकर दिला हे ऐकूनच तिसे हसणे थांबत नाही.
वाचा: प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, हिंदी व्हर्जनने कमावले कोट्यवधी रुपये
सावनीने हे लग्न मोडावे म्हणून हर्षवर्धनने मोठा डाव आखला आहे. त्याने बँक करप्ट झाल्याचे पेपर तयार केले आहेत. हे पेपर सावनीच्या हाती लागतात. तिला ते पाहून धक्का बसतो. हर्षवर्धन साधेपणाचा, सावनीची काळजी असल्याचा आव आणतो. पण तरीही सावनी हे लग्न ठरलेल्या दिवशीच होणार असे हर्षवर्धनला बजावून सांगते.