Premachi Gostha: हर्षवर्धनशी लग्न न केल्यामुळे सावनी आली रस्त्यावर, मुक्ताने केला मदतीचा हात पुढे
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Gostha: हर्षवर्धनशी लग्न न केल्यामुळे सावनी आली रस्त्यावर, मुक्ताने केला मदतीचा हात पुढे

Premachi Gostha: हर्षवर्धनशी लग्न न केल्यामुळे सावनी आली रस्त्यावर, मुक्ताने केला मदतीचा हात पुढे

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 31, 2024 02:25 PM IST

Premachi Gostha update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. पुन्हा एकदा मालिकेत वेगळे वळण आले आहे.

Premachi Gostha
Premachi Gostha

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता ही सतत सर्वांची मने जिंकत असते. पण तिचा साधेपणा हे सतत तिचे नुकसान देखील करत असते. अनेकदा नेटकऱ्यांनी मुक्ताला यावरुन ट्रोल देखील केले आहे. पण मालिकेत पुन्हा एकदा मुक्ता तिचा चांगूलपणा दाखवणार आहे. ती रस्त्यावर आलेल्या सावनी आणि आदित्यला घेऊन घरी जाणार आहे. खरं तर हे पाहून इंद्रा आणि सागरची काय प्रतिक्रिया असणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

इंद्राने मिहिकाच्या लगावली कानशि‍लात

मिहिका मुद्दाम हर्षवर्धनला घेऊन सागरच्या घरी जाते. तिचे लग्न झालेले पाहून मिहिरला धक्का बसतो. त्याला विश्वासच बसत नाही. शेवटी मिहिकासाठी आणलेले गिफ्ट हे लग्नाचा आहेर म्हणून देऊन टाकतो. त्यानंतर इंद्रा समोर येते आणि मिहिकाच्या कानशि‍लात लगावते. ती मिहिकाला जाब विचारते, 'तुला असे वाटत असेल की तुला असे का केलं विचारणारं कोणी नाही. पण मी आहे. तू मुक्ताची बहिण आहेस म्हणून मी लग्नाला तयार झाले होते. पण तू माझ्या मुलाशी चुकीचं वागलीस. तू सावनीसारखी निघालीस' असे म्हणते.

मुक्ता पुन्हा गेली मिहिकाच्या घरी

मिहिकाने जे काही केले ते मुक्ताला अजूनही पटत नाही. तिला सतत वाटते की हर्षवर्धनच्या प्रेशरखाली येऊन मिहिकाने हे लग्न केले आहे. ती सतत मिहिका काही तरी लपवते आहे असे म्हणत असते. ती पुन्हा मिहिकाला भेटण्यासाठी तिच्या घरी जाते. पण मिहिका पुन्हा तिचा अपमान करते आणि तिला निघून जायला सांगते. मुक्ताला वाईट वाटते. ती घरी निघून जाते.
वाचा : 'गुलिगत' सूरज चव्हाणचे एका दिवसाचे मानधन ऐकून कलाकारांना धक्का, वाचा रिल स्टारच्या मानधनाविषयी

आदित्यने रडत केला सागरला फोन

हर्षवर्धनने घराबाहेर काढल्यामुळे सावनीकडे राहायला घर नसते. ती वकिलांची भेट घेते पण तिला कोणतीही मदत मिळत नाही. शेवटी सावनीकडचे पैसे संपल्यानंतर ती रस्त्यावर येते. ती आदित्यला घेऊन बाहेर रस्त्यावर रडत उभी असते. शेवटी आदित्य सागरला फोन करतो. त्याला बोलावून घेतो. चुकून तो फोन मुक्ता उचलते. मुक्ता पळत जाते आणि आदित्यला घरी चल असे म्हणते. आता मुक्ता सावनी आणि आदित्यला घरी घेऊन आल्यावर इंद्र, सागरची वैगरे काय प्रतिक्रिया असणार हे पाहण्यासारखे आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आगामी भागाची उत्सुकता लागली आहे.

Whats_app_banner