'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी शांत बसायचे नाव घेत नाही. स्वत: कडे पैस नाहीत, राहायला घर नाही तरी ही तिचा माज कमी व्हायचे नाव घेत नाही. ती सतत मुक्ता आणि सागरला टोमणे मारताना दिसते. इतकच काय तर ती मुक्ताची जागा घेण्याचा देखील प्रयत्न करत आहे. आता मुक्ता सावनीवर प्रचंड चिडली आहे. तिने थेट सावनीला तू आई या पवित्र नात्यावर कलंक आहे असे म्हटले आहे. आता नेमकं असे काय झाले? चला जाणून घेऊया...
सावनीला खऱ्या हिऱ्यांचे कानातले हवे असतात गिफ्ट म्हणून. सागर खोटे कानातले घेऊन सावनीला देतो. जेव्हा सावनीला याविषयी कळते तेव्हा ती चिडते. ती सर्वांना धमकी देते जर आदित्यला कळाले तर तो किती वाईट वाटेल हे सांगते. त्यानंतर सावनी चिडते आणि जर तुमचे इतकेच आदित्यवर प्रेम आहे तर हे घर त्याच्या नावावर कर असे बोलते. सागर चिडतो. पण मुक्ता मात्र शांतपणे बोलते की आदित्यसाठी हा एक कागदाचा तुकडा महत्त्वाचा आहे का? ते ही करु. सागर घराच्या कागद पत्रांवर सही करतो आणि घर आदित्यच्या नावावर करतो.
लकी हा सतत मुलींना फिरवत असतो. तो कोणत्याही मुलीला कमिटमेंट देत नाही. सतत लग्नापासून लांब पळत असतो. आता तो मुक्ताच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या आरतीला डेट करत आहे. तो आरतीला घेऊन फिरायला जातो. आरती लकीला पुन्हा विचारते, 'लकी आज आपण सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. तू लग्नाविषयी घरी कधी विचारणार आहेस.' लकी त्यावर काहीच उत्तर देत नाही. लकी आरतीला देखील फसवणार का? असा प्रश्न पडला आहे.
हर्षवर्धन सतत मिहिकाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पण मिहिका त्याला काही करुन लांब करते. हर्षवर्धन मिहिकासाठी एक सुंदर साडी घेऊन येतो. तसेच तिला संध्याकाळी ही सुंदर साडी नेसून पार्टीमध्ये जायचे असल्याचे सांगतो. पण मिहिकाने हर्षवर्धनने आणलेली साडी फेकून दिली. तसेच पार्टीमध्ये येणार नसल्याचे सांगितले आहे. हर्षवर्धन मिहिकाला थेट धमकी देतो. तसेच या पार्टीला सगळे मोठे उद्योगपती येणार असल्याचे देखील सांगते. मिहिकाला या पार्टीत मुक्ता आणि सागर येणार असल्यामुळे जायला तयार होते. पार्टीमध्ये ती सर्वांसमोर हर्षवर्धनची किती चांगली पत्नी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते.
वाचा: अभिजीत सावंतचा बिग बॉस मराठीच्या घरातील गेम पाहून पत्नीने केली पोस्ट, म्हणाली...
मुक्ताच्या आईने मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. सावनी देखील या कार्यक्रमात सहभागी होते. पण सावनी सरळ इंद्राला धमकी देते हे घर माझे आहे आणि मी तुम्हाला घरातून बाहेर काढून टाकेन. तेवढ्यात मुक्ता येते आणि तिच्या हातातील पेपर फाडून टाकते. 'तू आई या नावाला कलंक आहेस' असे देखील मुक्ता म्हणते. आता मालिरकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.