मुक्ता आणि सागरमध्ये खुलले प्रेम, सावनीला बसला धक्का! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मुक्ता आणि सागरमध्ये खुलले प्रेम, सावनीला बसला धक्का! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

मुक्ता आणि सागरमध्ये खुलले प्रेम, सावनीला बसला धक्का! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Published May 31, 2024 12:43 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी ही सागर आणि मुक्तामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिचा प्रत्येक डाव हा अयशस्वी ठरत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया...

Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीचा नवा डाव
Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीचा नवा डाव

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागर कोळी आणि मुक्ता गोखले यांचे लग्न झाल्यापासून त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे येत असल्याचे पाहायला मिळाले आहे. सतत त्यांच्या आयुष्यात सागरची पहिली पत्नी सावनी डोकावत असल्याचे पाहायला मिळत आहे. सावनीला मुक्ता आणि सागर यांच्या नात्यामध्ये फूट पाडायची आहे. पण तिचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत. चला पाहूया मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

मुक्ताला कोसळले रडू

मुक्ताला क्लिनिकचे टेन्शन आले असते. तिला काही सुचत नाही. जर माझे लायसन्स काढून घेतले तर मी काय करणार? असा प्रश्न तिला पडला आहे. मुक्ता विचार करत असताना इंद्रा तिला चहा ठेवण्यास सांगते. तो चहा उतू जातो. ते पाहून इंद्रा आणखी चिडते आणि तू बेजवाबदार असल्याचे बोलते. मुक्ताला ते ऐकून रडू कोसळते. ती इंद्राला मी अजिबात बेजवाबदार नसल्याचे सांगून निघून जाते.
वाचा: 'इंडियाज बेस्ट डान्सर ४'साठी ऑडिशन द्यायची आहे? मग जाणून घ्या कधी आणि कुठे होणार

मुक्ताने इंद्रासाठी केली खरेदी

मिहिका आणि मिहिरचे लग्न असल्यामुळे कोळी आणि गोखले कुटुंबीय तयारी करत आहेत. मुक्ता आणि सागरने जाऊन खरेदी केली आहे. पण इंद्राला मुक्ताचे वागणे जराही आवडत नाही. ती मुक्ताला घालून पाडून बोलण्याची एकही संधी सोडत नाही. मुक्ताने आणलेली साडी इंद्राला जराही आवडलेली नाही. इंद्रा मुक्तासमोर तशीच फेकून देते. सागरला कळत नाही का मला काय आवडतं असे ती पुन्हा प्रश्न करते.
वाचा: अमोलमुळे अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकत्र येणार? 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत मोठा ट्विस्ट

सावनीने आखला नवा डाव

मुक्ताचे लायसन्स कसे रद्द करता येईल यासाठी सावनी प्रयत्न करत असते. ती त्यासाठी मुक्ताचे पेशंट आणि हर्षवर्धनच्या मित्राची सत्यमची मदत घेते. सत्यम मुक्ताविरोधात तक्रार करतो आणि मुक्ताचे लायसन्स रद्द करण्यास सांगतो. आता मुक्ता आणि सागर ते लायसन्स परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात.
Aavesham Review: एका गँगस्टरसोबतची मैत्री! जाणून घ्या काय आहे 'आवेशम' सिनेमाची कथा

सागर आणि मुक्तामध्ये जवळीक

सागर आणि मुक्ताच्या खोलीमधील बाथरुमचा लॉक खराब झालेला असतो. त्यामुळे सागर बाथरुममध्ये असतानाच मुक्ता देखील तेथे पोहोचते. दोघेही बाथरुममध्ये अडकून पडलेले असतात. तेवढ्यात मुक्ताचा पाय घसरतो आणि ती सागरच्या अंगावर पडते. त्यामुळे सागर आणि मुक्तामध्ये जवळीक निर्माण होते.

Whats_app_banner