'प्रेमाची गोष्ट' या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेत सागर कोळीची पूर्व पत्नी सावनी ही सतत काही ना काही तरी डाव आखत असते. गोखले आणि कोळी कुटुंबीयांच्या आयुष्यात राडा करण्याचा तिचा हेतू काही संपत नाहीये. ती स्वत:चा मुलगा आदित्यला ढाल बनवून आतापर्यंत खेळ खेळताना दिसली. पण आता तिला तिचा बॉयफ्रेंड हर्षवर्धनदेखील साथ देत आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मिहिकाच्या लग्नाच्या तयारीने होते. गोखले कुटुंबीय सकाळी उठल्यापासून मिहिकाच्या लग्नासाठी लागणाऱ्या गोष्टींची तयारी करताना दिसत आहेत. पण मिहिकाची आई ऑस्ट्रेलियामध्ये असल्यामुळे तिला लग्न होत असल्याची भावना येत नाही आहे. शेवटी माधवी तिला समजावते की तुझ्या समोर रडायला नको म्हणून मी काही बोलत नाही. पण तू लग्न होऊन जाणार याचा मला आनंदच आहे पण वाईटही वाटत आहे. तेवढ्यात सागर तेथे आणि लग्नाच्या कामात हातभार लावतो.
वाचा: तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल! 'आम्ही जरांगे' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
मुक्ता, सागर आणि गोखले कुटुंबीय आनंदाने मिहिकाच्या लग्नाची तयारी करत असतात. तेवढ्यात मुक्ताला डेंटल असोसिएशनची नोटिस येते. एका पेशंटने तक्रार केल्यामुळे तिचे लायसन्स रद्द करण्यात येणार असल्याचे त्यामध्ये म्हटले गेले आहे. पण सर्वांच्या आनंदावर विरझण नको घालायला म्हणून मुक्ता ही नोटीस दुसऱ्याच गोष्टीची असल्याचे सांगते. पण सागरला मुक्ताचे काही तरी बिनसले असल्याची जाणीव होते. दोघेही बिल्डींग खाली जातात. तेव्हा सागरला मुक्ता सांगते नेमकं काय झालं. तेवढ्यात मुक्ताला आरतीचा फोन येतो. काही लोकांनी क्लिनिकला टाळा लावल्याचे ती सांगते.
वाचा: हे निराशाजनक आहे; 'ऑल आइज ऑन रफा' पोस्ट माधुरीने डिलिट करताच नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
सागर-मुक्ताच्याविरोधात सावनी-हर्षवर्धन कट आखतात. दोघांची व्यावसायिक बदनामी करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगते. त्यावर हर्षवर्धन माझ्या माणसांनी काम सुरू केले असल्याचे सांगतो. त्याच वेळी हर्षवर्धनचा मित्र सत्यम येतो. हा सत्यम मुक्ताच्या क्लिनिकमध्ये दात दुखतोय म्हणून आलेला तिरसट पेशंट असतो. त्याने आपण मुक्ताला कसा त्रास दिला होता हे सांगतो. मुक्ताच्या अडचणीत वाढ करणार असल्याचे तो सांगतो. आता मुक्ता कशी अडचणीत येईल याचा विचार करून सावनी मनात खूप खूश होते.
वाचा: नारीचा आत्मा काही वेगळ्याच कारणासाठी आला आहे; ‘अल्याड पल्याड'चा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित
संबंधित बातम्या