'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता ही कोळी कुटुंबाला सांभाळताना दिसते. ती सई पासून इंद्रा पर्यंत सगळ्यांसाठी सर्वकाही करताना दिसत आहे. ती सगळ्यांची योग्य ती काळजी घेताना दिसते. आता त्यांच्या घरात सावनी आणि आदित्य राहायला आले आहेत. सावनी मुक्ताला सतत त्रास देताना दिसते. ती आदित्यच्या मनात देखील कोळी कुटुंबीयांविषयी वाईट गोष्टी भरवताना दिसते. सावनी आदित्यचा वापर करुन कोळींचे घर मिळवण्याचा प्रयत्न करते. आता मुक्ताने सावनीचा हा प्रयत्न अपयशी ठरवला आहे. तिथे थेट घराचे पेपर फाडून टाकले आहेत.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेची सुरुवात ही मुक्ताच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाने होते. मुक्ताची आई माधवीने हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. मुक्ता आणि सर्व कोळी कुटुंबीय या कार्यक्रमात सहभागी होतात. सावनी देखील नटून थटून कार्यक्रमात येते. मगंळागौरीला खेळल्या जाणाऱ्या खेळात मुक्ता सावनीला हरवते. सावनीला त्याचा राग येतो. पण काही करु शकत नाही म्हणून शातं बसते.
हरल्यानंतरही सावनी शांत कशी असा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण सावनीच्या मैत्रिणी तिला तिच्या बेडरुममध्ये येऊन याविषयी विचारतात. त्यावर सावनी म्हणते खरा डाव तर मी जिंकली आहे. सागरने त्याचे घर आदित्यच्या नावावर केले आहे. आता हळूहळू हे घर तो माझ्या नावावर करेल. मग मी या सगळ्यांना घराबाहेर हकलून देईन. सागरची पत्नी मुक्ता अगदीच साधी आहे. आदित्यचे नाव पुढे केले की ती सर्व काही करायला तयार होते. तेवढ्यात मुक्ता तेथे येते आणि सर्व काही गुपचूप ऐकते.
वाचा: व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे, ते कपडे बदलताना पाहायचे; अभिनेत्रीने केला खबळजनक खुलासा
सागर सावनीला घराचे पेपर देतो. या कागदावर त्यांचे राहाते घर आदित्यच्या नावावर असल्याचे लिहिलेले असते. सावनीच्या हातात पेपर देऊन सागर निघून जातो. तेवढ्यात मुक्ता तेथे येते आणि ते पेपर खेचून घेते. त्यानंतर ती ते पेपर फाडून टाकते. सावनीला राग अनावर होतो. ती मुक्तावर हात उचलते. तेवढ्यात सर्व कोळी कुटुंबीय येतात. सागर आणि इंद्रा सावनीला थांबवतात. सावनी आदित्यला पाहून रडायचे नाटक करते. तेवढ्यात मुक्ता समोर येते आणि आदित्यला सांगते की, 'आदित्य तुला भीती वाटते ना मी तुला घराबाहेर काढेन. मी तुला सगळ्यांसमोर सांगते की मी तुला कधीही घराबाहेर काढणार नाही.'