Premachi Goshta: आरतीने केली लकी विरोधात तक्रार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीचा डाव होणार यशस्वी-star pravah premachi goshta serial 2nd october 2024 update ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: आरतीने केली लकी विरोधात तक्रार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीचा डाव होणार यशस्वी

Premachi Goshta: आरतीने केली लकी विरोधात तक्रार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीचा डाव होणार यशस्वी

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 02, 2024 02:15 PM IST

Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. या मालिकेत आता आरतीने लकी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार
Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार

Premachi Goshta Update: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'प्रेमाची गोष्ट.' सध्या मालिकेत लकीचे प्रकरण समोर आले आहे. मुक्ताच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या आरतीच्या पोटात लकीचे बाळ असते. पण लकी त्या बाळाला नाव देण्यास नकार देतो. आता मुक्ता आरतीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. पण या सगळ्यात सावनी आरतीचे कान भरते. त्यामुळे आरती लकी विरोधात तक्रार दाखल करते.

आशूला सागरने घरात घेतले नाही

मुक्ताची तब्बेत ठीक नसल्यामुळे 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आशू मुक्ताला बघण्यासाठी घरी येतो. तो सोबत फुलांचा गुच्छ घेऊन येतो. पण सागरा आशूचा पहिल्यापासून राग येतो. तो सतत आशूचा राग करत असतो. सागर आशूला दारातूनच हकलून देतो. मुक्ता झोपली आहे, तिला आरामाची गरज आहे असे सागर आशूला बोलतो. त्यानंतर आशू तेथून निघून जातो. सागर रागारागात घरात येतो आणि आशूने आणलेला फुलांचा गुच्छ फेकून देतो.

मुक्ताला केला आशूने फोन

मुक्ताची काळजी घेण्यासाठी एक नर्स घरी असते. जोपर्यंत मुक्ता ठीक होत नाही तोपर्यंत ती तिथेच राहणार असते. आशूचा फोन येतो आणि मुक्ता त्याच्याशी बोलत असते. तेवढ्यात सागर येतो आणि तिचा फोन काढून घेतो. नर्स देखील आशूला फोनवर ओरडते.
वाचा: ब्रेकअप करण्यासाठी मी दुसऱ्या मुलासोबत सेक्स करायचे; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

आरतीने केली लकी विरोधात तक्रार

सागर लकीशी आरतीचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतो. इंद्रा देखील सागरला या निर्णयामध्ये पाठिंबा देते. पण या सगळ्या गोष्टी इतक्या सुरळीत कशा पटकन होत आहेत हे पाहून सावनीचा जळफळाट होतो. सावनी नवा प्लान आखते. ती आरतीच्या घरी जाते. तिला लकी आणि मुक्ता विरोधात भडकवते. तसेच पोलिसात तक्रार करण्यास प्रोत्साहन देते. आरती देखील सावनीच्या डावाला बळी पडते. त्यामुळे ती लकी विरोधात तक्रार करते. नंतर मुक्ता आरतीला सजमवण्याचा प्रयत्न करते. पण आरती काही ऐकायला तर नाही. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Whats_app_banner