'प्रेमाची गोष्ट' मालिकेत बऱ्याच दिवसांनंतर मुक्ता आनंदी असल्याचे दिसत आहे. मुक्ताने तिच्या सगळ्या सुख दु:खात सहभागी झालेल्या कोळी कुटुंबीयांचे आभार मानण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तिने स्वत:च्या हाताने मासे बनवले आहेत. आता इंद्राला मुक्ताने बनवलेले मासे आवडणार का? असा प्रश्न पडला आहे. चला जाणून घेऊया...
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मुक्ताच्या हसऱ्या चेहऱ्यापासून होते. मुक्ता सकाळी लवकर उठते. मच्छी बाजारात जाऊन मच्छी विकत आणते. ती मच्छी कोळीन मावशीकडून साफ करुन घेते. त्यानंतर घरी आल्यावर मुक्ता यूट्यूबवर बघून मच्छीचं कालवण बनवते. इंद्रा सकाळी उठल्यावर स्वयंपाक घरात येते तेव्हा ती मुक्ताला स्वयंपाक करताना बघते. मुक्ताने मच्छीचे कालवण बनवलेले पाहून इंद्राला प्रचंड आनंद होतो.
मुक्ताने मच्छीचे कालवण बनवल्याचे पाहून इंद्राने सागर, स्वाती, लकी, सई यांना आवाज दिला. त्यांना मुक्ताने कालवण बनवले हे सांगितले. ते ऐकून सर्वजण चकीत झाले. सागरने तर मुक्ताला थेट विचारले की तिने कालवणामध्ये गूळ तर टाकला नाही ना. त्यावर मुक्ताला हसायला आले. सर्वांनी आनंदाने मुक्ताने बनवलेले कालवण संपवले. त्यानंतर सागर स्वातीच्या हातात पैसे देतो आणि स्वाती ते शगून म्हणून मुक्ताला देते.
सावनीकडून वकील कागदपत्रावर सही करुन घेतो की हर्षवर्धनच्या कोणत्याही संपत्तीमध्ये तिचा हात नाही. जेव्हा सावनीला हे कळते तेव्हा तिला धक्का बसतो. ती हॉटेलच्या खोलीत दारु पित बसते. तिच्याकडे खोलीचे भाडे मागण्यासाठी एक हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारी येतो. सावनी पॅकेटमध्ये असलेले सगळे पैसे देते. नंतर तिच्याकडे पैसे नाहीत हे कळाल्यावर सावनीला खोलीतून हकलून दिले जाते.
वाचा: 'तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते', उत्कर्ष शिंदेचा गोलिगत सूरज चव्हाणला पाठिंबा
हर्षवर्धनने घराबाहेर काढल्यामुळे सावनीकडे राहायला घर नसते. ती वकिलांची भेट घेते पण तिला कोणतीही मदत मिळत नाही. शेवटी सावनीकडचे पैसे संपल्यानंतर ती रस्त्यावर येते. ती आदित्यला घेऊन बाहेर रस्त्यावर रडत उभी असते. शेवटी आदित्य सागरला फोन करतो. त्याला बोलावून घेतो. चुकून तो फोन मुक्ता उचलते. मुक्ता पळत जाते आणि आदित्यला घरी चल असे म्हणते. तसेच आदित्यला त्याचे कुटुंब असल्याची जाणिव करुन देते. आता मुक्ता सावनी आणि आदित्यला घरी घेऊन आल्यावर इंद्र, सागरची वैगरे काय प्रतिक्रिया असणार हे पाहण्यासारखे आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आगामी भागाची उत्सुकता लागली आहे.
संबंधित बातम्या