Premachi Goshta: सावनीच्या मेहंदी कार्यक्रमाला सुरुवात, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: सावनीच्या मेहंदी कार्यक्रमाला सुरुवात, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?

Premachi Goshta: सावनीच्या मेहंदी कार्यक्रमाला सुरुवात, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 29, 2024 01:41 PM IST

Premachi Goshta Serial Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत आज काय घडणार चला जाणून घेऊया...

premachi goshta: प्रेमाची गोष्ट
premachi goshta: प्रेमाची गोष्ट

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत. सागर आणि मुक्तामध्ये जवळीक निर्माण होत आहे. दोघे एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सावनीच्या लग्नाची तयारी सुरु असताना हर्षवर्धनला मिहिका आवडू लागली आहे. तरीही हर्षवर्धन सावनीशी लग्न करत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार वाचा...

मुक्ताचा फोन येताच मिहिका आली घरी

मिहिका एका इवेंट मॅनेजमध्ये काम करत आहे. तिचा पहिला प्रोजेक्ट हा सावनी आणि हर्षवर्धनचे लग्नचे आहे. त्यानिमित्ताने मिहिका हर्षवर्धनच्या घरी जात असते. पण हर्षवर्धनच्या मनात वेगळ्या गोष्टी येताना दिसत आहेत. तो मिहिकाला एकटीला मिटिंगसाठी बोलावतो. मिहिका देखील तेथे जाते. तेवढ्यात मिहिकाला मुक्ताचा फोन येतो आणि ती तिला तेथून निघायला सांगते. मिहिका घाईघाईत तेथून निघते.
वाचा : लेकाच्या लग्नासाठी नीता अंबानी यांची खास तयारी, खरेदी केलेल्या नव्या साडीची किंमत माहिती आहे का?

हर्षवर्धनने घेतले आजारपणाचे सोंग

सावनीने लग्नाची घोषणा करण्याची पत्रकार परिषद आयोजित केलेली असते. ती सर्वांना बोलावते. पण या सगळ्यात हर्षवर्धन मात्र कोणाचेही फोन घेत नाही. सावनी चिडून त्याच्या घरी जाते. तेव्हा ती पाहाते की हर्षवर्धन आजारी आहे. हर्षवर्धनने हे सोंग आणलेले असते. तो काही आजारी नसतो. सावनी देखील त्याच्या नाटकावर विश्वास ठेवते आणि मेहंदीच्या तयारीला लागते.
वाचा : 'प्रेमासाठी लढणार', ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर मलायका अरोराने सोडले मौन

सावनीच्या मेहंदीची तयारी

सावनी आणि हर्षवर्धनचे लग्न होणार असल्यामुळे ते गोखलेंच्या घरात राहात असते. आता सावनीच्या मेहंदीचा कार्यक्रम देखील घरच्या घरी ठेवण्यात येतो. सर्वजण जमा होतात. सावनी तिच्या हातावर मेहंदी काढते. चुकून सईचा धक्का लागल्यामुळे सावनीच्या हातावरची मेहंदी ही हर्षवर्धनच्या कपड्यांना लागते. सावनी चिडते आणि सईवर हात उगारते. तेवढ्यात मुक्ता तेथे येते आणि तिला अडवते. 'माझ्या मुलीपासून लांब रहायचं. ती लहान आहे तिला समजून सांगायचं' असे मुक्ता चिडून बोलते. सावनी याचा प्रचंड राग येतो. सावनी नवा काय डाव आखणार हे आता मालिकेच्या आगामी भागात कळणार. मालिकेत नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा : मुंबईतील पॉश भागात आमिर खानने खरेदी केला नवा फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का

Whats_app_banner