'प्रेमाची गोष्ट' मालिकेत अखेर सावनी आणि हर्षवर्धनचे लग्न मोडले आहे. असे ही हर्षवर्धनला सावनीशी लग्न करण्याची जराही इच्छा नव्हती. त्यामुळे तो फक्त निमित्त शोधत होता. आता अखेर त्याने मिहिकाला मोहरा बनवून लग्न मोडले आहे. त्यानंतर त्याने सावनीला गृह प्रवेशाची तयारी करण्यास सांगितले. पण सावनीला हे माहिती नाही की हर्षवर्धनने दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे. आता मालिकेत आजच्या भागात काय होणार हे जाणून घेऊया...
मिहिका फक्त एक चिठ्ठी लिहून घरातून बाहेर गेली आहे. तसेच तिने मिहिरला देखील लग्नासाठी सध्या तयार नसल्याचे सांगून थोडा वेळ दे असे म्हटले आहे. तरीही मुक्ताला ते मान्य नाही. मुक्ता मिहिकाच्या सगळ्या मैत्रिणिंना फोन करुन ती आली आहे का? तिच्याशी काही बोलणे झाले का? असे विचारत आहे. तसेच सागर देखील मिहिकाच्या एका मैत्रिणिच्या घरी जाऊन मिहिका आहे का हे पाहात असतो. पण मिहिकाचा मात्र काहीच पत्ता लागत नाही.
हर्षवर्धन सावनीला गृहप्रवेशाची तयारी करायला सांगितली आहे. सावनी प्रश्न पडतो की हर्षवर्धनने असे का करायला सांगितले आहे. ती सगळी तयारी करते. नंतर हर्षवर्धन गळ्यात हार घालून पाहून सावनी त्याला विचारते तू आधीच का घातला आहे. त्याने लग्न केल्याचे सांगितले आहे. ते ऐकून सावनीला धक्का बसतो. त्यातही हर्षवर्धनने मिहिकाशी लग्न केले पाहून तिला आणखीच धक्का बसतो. ती हर्षवर्धनला अद्दल घडवण्याचा निर्णय घेते.
हर्षवर्धनने सावनीला घरातून धक्के मारुन बाहेर काढले आहे. सावनी नाईलाजाने हॉटेलमध्ये एक खोली बूक करुन तेथे राहते. सोबत आदित्यला देखील घेऊन जाते. आदित्यला तेथे राहण्यामागचे कारण विचारतो. पण सावनी त्याला फार काही सांगत नाही. त्यानंतर सावनी वकीलांना फोन करते आणि भेटायला बोलावते. आता सावनी पुढे काय करणार हे मालिकेच्या आगामी भागात कळेल.
वाचा: इंडियन आयडल जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांचे अभिजीत सावंतने काय केले? वाचा सविस्तर
हर्षवर्धन प्रेस कॉन्फरन्स घेतो. त्याला त्याच्या पत्नीचा चेहरा सर्वांसमोर आणायचा असतो. त्यामुळे तो या प्रेस कॉन्फरन्समध्ये मिहिकाची ओळख सर्वांसमोर करुन देतो. ते पाहून मुक्ताला आणि सागरला देखील धक्का बसतो. हे नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न त्यांना पडतो. हर्षवर्धनने मिहिकावर जबरदस्ती केली असेल असे दोघांनाही वाटते. म्हणून ते तातडीने हर्षवर्धनच्या घरी जातात. तेथे मिहिका सर्वांसमोर मी माझ्या मर्जिने लग्न केल्याचे सांगते. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या