मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  माधवी आदित्यला करणार का माफ? सावनीने आखला नवा डाव, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

माधवी आदित्यला करणार का माफ? सावनीने आखला नवा डाव, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
May 28, 2024 01:14 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. सागरने आदित्यचे सत्य सर्वांसमोर आणले आहे. त्यामुळे माधवी आता त्याला माफ करणार की नाही हे आजच्या भागात कळेल.

premachi goshta: सावनीने आखला नवा डाव
premachi goshta: सावनीने आखला नवा डाव

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजचा भाग पाहण्यासाठी खरं तर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सागर हा आदित्यचे सत्य सर्वांपासून लपवताना दिसत आहे. पण आता मात्र मुक्ताने समजावल्यावर सागरने आदित्यचे सत्य सर्वांसमोर आणले आहे. ते ऐकून माधवी आणि पुरु आदित्यला माफ करणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय घडणार?

ट्रेंडिंग न्यूज

सावनी सागरला गुंगीचे औषध देऊन त्याच्यासोबत विचित्र वागते. तेवढ्यात मुक्ता तेथे पोहोचते आणि सागरला घरी घेऊन येते. घरी आल्यावर सागर मुक्ताशी बोलत असतो. तेव्हा मुक्ता त्याला विचारते अपघात सावनीने केला आहे का? त्यावर सागर हा अपघात आदित्यकडून झाला आहे असे सांगतो. ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो. पण मुक्ता सागरला समजावते. ती आदित्यला योग्य ती शिक्षा देण्याचा सल्ला देते. कारण भविष्यात त्याच्याकडून यापेक्षा मोठ्या चुका होऊ शकतात.
वाचा: अरे हाय काय अन् नाय काय;'गेला माधव कुणीकडे' नाटक पुन्हा पाहायचे? मग ही बातमी नक्की वाचा

सागरने आदित्यला सावनीकडून आणले

सागर सकाळी उठल्यावर पहिले सावनीच्या घरी जातो. तिला माझ्यासोबत जे काही केलस अतिशय चुकीचे केले असे बोलतो. त्यानंतर तो आदित्यला बोलावतो आणि घरी घेऊन येतो. तो आदित्यला माधवी आणि पुरुषोत्तम यांच्या घरी घेऊन जातो. मुक्ता आधीपासून तेथेच असते. ती माधवीकडे सल्ला मागते. जर एखादी चूक आपल्यामधील कोणी केली असेल तर नात्याकडे लक्ष द्यावे की सत्याची बाजू घ्यावी. तेवढ्यात सागर तेथे पोहोचतो आणि आदित्यने अपघात घडवून आणला हे सांगतो. आता मालिकेच्या आगामी भागात मुक्ता, माधवी आणि पुरु आदित्यला माफ करणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: 'मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा', मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक

सावनी आणि हर्षवर्धनने आखला नवा डाव

सागरला मानसिकदृष्ट्या हतबल करण्यासाठी सावनी आणि हर्षवर्धन मुक्ताच्या मागे लागले आहेत. त्यांनी असा काही डाव आखला आहे की मुक्ताचे लायसन्स जप्त झाले आहे. याबाबत मुक्ताला कळताच तिला धक्का बसतो. आता सागर या प्रकरणी काय करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: सागरने सांगितले आदित्यते सत्य, काय असणार मुक्ता आणि माधवीची प्रतिक्रिया? ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये काय घडणार

टी-२० वर्ल्डकप २०२४